भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले, पोस्टरच्या माध्यमातून टीका
पुण्यातील मुख्य चौकांमध्ये असे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरच्या माध्यामातून पुणेकरांनी आपला राग व्यक्त केला आहे. तुमच्या कारभाराला पुणेकर वैतागले असल्याचंही या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
![भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले, पोस्टरच्या माध्यमातून टीका banners against bjp in pune over water supply issue भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले, पोस्टरच्या माध्यमातून टीका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/21081455/poster.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील पाणीकपातीवर पुणेकरांना पोस्टरच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधल आहे. पुणेकरांनी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपने पुण्याची वाट लावल्याचं म्हटलं आहे. मात्र हे पोस्टर कुणी लावले आहेत हे अद्याप कळू शकले नाही.
'गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, शंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट' अशी चारोळी पाण्याच्या समस्येवरुन पुणेकरांनी भाजपला लक्ष्य केलं. पुण्यातील मुख्य चौकांमध्ये असे पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरच्या माध्यामातून पुणेकरांनी आपला राग व्यक्त केला आहे. तुमच्या कारभाराला पुणेकर वैतागले असल्याचंही या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.
पुण्यात पाणीसंकट दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात अघोषित पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील दोन पंप बंद केले आहेत. हे पंप बंद केल्याने पुण्याच्या दररोजच्या पाण्यात अडीचशे एमएलडी इतकी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला आहे.
खडकवासला धरण समुहातील धरणांमधे कमी पाणी शिल्लक असल्याने हे पाणी पुणे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेती आणि पिण्यासाठी पुरवून वापरायचे असेल तर पुण्यात पाणीकपात करणं आवश्यक आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)