Pooja Khedkar: पूजा खेडकरची नियुक्ती रद्द होणार? यापुर्वी कोणाची निवड झाली रद्द, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी दिली मोठी माहिती
Pooja Khedkar: पूजा खेडकरवर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे, पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Pooja Khedkar: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर (IAS Pooja Khedkar) एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे, पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar)निवड रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आता या नोटीसवरती पूजा खेडकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व प्रकरणावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, पूजा खेडकर प्रकरण नुसतंच माझ्या वाचनात आलं. यूपीएससी सारख्या व्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे. ती कठोर पावले ते उचलताना दिसत आहेत. यूपीएससीच्या त्या निवेदनात स्पष्टपण म्हटलं आहे. नियमानुसार असलेल्या संधीपेक्षा जास्त वेळा ते देखील फसवणूक करून संधी घेतली आहे.
माझी यूपीएससीकडून अपेक्षा आहे, त्यांनी कठोरपणे कारवाई करावी. यूपीएससीवर असलेला विश्वास ते टिकवून ठेवत योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. तर याआधी देखील अशी दोन ते तीन प्रकरणे समोर आलेली आहे. त्यांची नियुक्ती देखील रद्द करण्यात आल्याचं माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.
पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर (IAS Pooja Khedkar) एफआयआर दाखल करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे, पूजा खेडकरचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर केलेली आहेत, ती बोगस असल्याचे एव्हाना सिद्ध झाली आहे, त्यानंतर यूपीएससीने हा मोठा निर्णय घेतला आहे. पूजा खेडकर 2018 पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होती. मात्र 2018 नंतर तिने नाव बदलले, खोटी ओळख निर्माण केली, दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे सादर केली. ही खोटी कागदपत्रे मिळवताना तिने माहिती लपवली. जेव्हा वैदकीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यानंतर अनेक गंभीर प्रकार लक्षात आले आणि त्यानंतर युपीएससीने हे पाऊल उचललं आहे.पूजा खेडकरचे फक्त आयएएस पद्द रद्द करणे नाही तर आयएएस पद मिळवण्यासाठी जी कृत्ये केली आहेत ती अतिशय गंभीर आहे किंवा गुन्ह्याच्या स्वरूपाची आहे हे लक्षात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करायचं ठरवले आहे.
संबधित बातम्या - पूजा खेडकरची उलटी गिनती सुरु, UPSC गुन्हा दाखल करणार, पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली!