एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेत मराठी बाणा शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडावं: अशोक चव्हाण
पिंपरी: 'शिवसेनेत मराठी बाणा शिल्लक असेल तर त्यांनी एका मिनिटात सत्तेतून बाहेर पडावं.' काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला असं आव्हान दिलं आहे. ते पिंपरीतील एका सभेत बोलत होते.
'शिवसेना-भाजपच्या जागरण-गोंधळातून जनतेचं सुरु असलेल्या करमणुकीमुळे थिएटर आणि नाट्यगृह ओस पडली आहेत. आता या करमणुकीवर कर लावण्याची वेळ आली.' अशीही कोपरखळी अशोक चव्हाणांनी मारली.
मुंबई महापालिकेत युती तुटल्यानंतर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडावं अशी मागणी विरोधकांकडून सुरु आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे आज ठाण्याच्या सभेत म्हणाले की, ‘धनुष्य बाणावर बटन दाबाच पण दिवा लागतो का तपासून पाहा. कारण सगळे थापाडे आहेत, काय करतील सांगता येत नाही. शिवसेनासोबत नसती तर स्वप्नात तरी खुर्ची बघितली होती का?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
दरम्यान, याचवेळी पुण्यात मनोहर पर्रिकरांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली. ‘देशात ज्याप्रमाणे मोदी उत्तम पद्धतीनं सरकार चालवत आहेत. त्याच पद्धतीनं राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. पण ठाकरे साहेबांना त्याचाच त्रास होत आहे.’ पुण्यातील प्रचारसभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
संबंधित बातम्या:
शिवसेनासोबत नसती तर खुर्ची बघितली असती का?: उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांचा कारभार उत्तम, त्याचाच ठाकरें साहेबांना त्रास: पर्रिकर
भ्रष्टाचार करु दिला नाही म्हणून काही जणांनी पक्ष सोडला : राज ठाकरे भाजपच्या बँकेत मतांची गुंतवणूक करा, 5 पट विकास परतावा देऊ: मुख्यमंत्री मनसेच्या 'त्या' विनंतीकडे शिवसेनेचं दुर्लक्ष 'आदित्य ठाकरे मुंबईसाठी अदखलपात्र' : आशिष शेलार जगात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंहांची ओळख होती : दानवेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement