एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023 : संत तुकाराम महाराजांचे शिष्य अनगडशाह बाबांच्या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हिंदू कुटुंबाकडे; तीन पिढ्या देत आहे दर्ग्यात सेवा

आषाढी वारीचा सोहळा सर्व धर्मियांना एकाच छताखाली आणतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच, हिंदू-मुस्लिम एकतेचं दर्शन घडतं.

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीचा सोहळा सर्व धर्मियांना एकाच छताखाली आणतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होताच, हिंदू-मुस्लीम एकतेचं दर्शन घडतं. पालखीचा पहिल्याच विसावा हा हजरत अनगडशाह बाबांच्या दर्गा मंदिरात असतो. महाराज आणि बाबा असणारं गुरु-शिष्याचं नातं आजही जपलं जातं. त्यामुळेच पंढरपूरकडे मार्गस्थ होतानाच सर्वात आधी वारकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतात. विशेष म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हा मुसुडगे या हिंदू कुटुंबाला आहे. 

गोविंद मुसुडगे हे अनगडशाह बाबा दर्ग्याचे पुजारी आहेत. त्यांच्या तीन पीढ्या या दर्ग्याची देखभाल करतात. त्याच्या आजोबांनी या दर्ग्याची सेवा करायला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वर्ष त्यांच्या वडिलांनीदेखील या ठिकाणी सेवा दिली. या दोघांनंतर 2009 पासून गोविंद मुसुडगे दर्ग्यात सेवा देत आहेत. ते सांगतात की, आम्ही आणि आमचं कुटुंब मनोभावे या दर्ग्याची सेवा करतो आणि करत राहू.

'तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग  अनगडबाबा शाह यांना दिला'

तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात की, "तुकाराम महाराजांची जीवन प्रणाली ज्या तत्वाने कार्यरत झाली ही सर्वधर्मसमभावाचं तत्व आहे. याच भक्ती सांप्रदायाच्या चळवळीमध्ये तुकाराम महाराजांना सगळ्या धर्माच्या लोकांनी मदत केली आहे. त्यामुळे भक्ती सांप्रदायाचं हे प्रतिक हे मंदिर आहे. भक्ती सांप्रदायाचा आणि वारकरी सांप्रदायाचा पाया रचला त्याचा कळस हा सगळ्यांनी मदत केली म्हणून उभा राहिला. त्यांनी अनेकांचा उद्धार केला आहे जात पात बाजूला ठेवून काम केलं आहे. त्याकाळी अनगडबाबा शाह तुकारामांसोबत कीर्तनालादेखील जात असत. त्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांच्या जमिनीचा काही भाग अनगडबाबा शाह यांना दिला होता. त्यामुळे मागील शेकडो वर्षांपासून पालखी प्रस्थान झालं की पहिली कीर्तन आरती या अनगडबाबा शाह यांच्या दर्ग्यात होते आणि पहिला विसावादेखील याच दर्ग्यात होतो. 

'हिंदू मुस्लिमांच्या वादाचा दर्ग्यावर परिणाम नाही'

राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांचे वाद आणि तेढ निर्माण झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र मागील शेकडो वर्षात या वादाचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगडबाबा शाह यांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम झाल्याचं दिसलं नाही आहे. त्यावर बोलताना तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात की, "जे लोक संतांच्या विचाराशी सहमत होतात त्यावेळी संत हे धर्माच्या पलीकडे असतात. जोपर्यंत माणसाला एखाद्या गोष्टीचा खरा अर्थ कळत नाही तोपर्यंत कोणताही माणूस काठीचा आधार घेऊन चालत असतो. मात्र ज्यावेळी जगाचं कल्याण संतांना कळतं त्यावेळी संत समाजाला आणि मानवतेला नतमस्तक होत असतं." 


संबंधित बातमी-

Ashadhi Wari 2023: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा, 10 जूनला पंढरपूरसाठी प्रस्थान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Embed widget