एक्स्प्लोर
डॅडी अरुण गवळी तुरुंगात, मम्मीच्या हाती गँगची सूत्रं
अरुण गवळीची पत्नी आशा गवळी ही मम्मी नावाने या गँगचे नेतृत्व करत असल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.

पिंपरी चिंचवड : कुख्यात गुंड अरुण गवळी गॅंगने पुणे जिल्ह्यात खंडणीचा हैदोस घातला आहे. अरुण गवळीची पत्नी आशा गवळी ही मम्मी नावाने या गँगचे नेतृत्व करत असल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. गेल्या दोन आठवड्यात मंचर पोलिस स्टेशनमध्ये या गॅंग विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तर आणखी दोन व्यावसायिक गुन्हा दाखल करण्याचा तयारीत आहेत. या प्रकरणी तिघांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर मम्मीला अटकपूर्व जामिनामुळे दिलासा मिळाला आहे. दोन व्यावसायिकांकडे पाच लाखाची तर आता नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात तीस हजाराची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलिस आणि गुन्हे शाखेकडून व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण केला जात आहे, यामुळे व्यावसायिक गुन्हा दाखल करायला पुढे येऊ लागले आहेत. डॅडी तुरुंगात असल्यानं मम्मीने गॅंगची सूत्रं हाती घेतल्याचं यावरुन स्पष्ट झालं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























