एक्स्प्लोर

Ankita Patil : हर्षवर्धन पाटील 100 टक्के निवडणूक लढवणार, पण कसे लढतील ते आताच सांगणार नाही; अंकिता पाटलांचं वक्तव्य, इंदापुरात पहिली ठिणगी?

Ankita Patil Indapur : महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही, त्यामध्ये काय होतंय ते महत्त्वाचं असं सूचक वक्तव्य अंकिता पाटील यांनी केलं.

पुणे : राज्यात महायुती होणार हे निश्चित असलं तरी त्याच्या जागावाटपावरून मात्र आतापासूनच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादाची ठिणगी इंदापूरमध्ये पडणार असल्याचं चित्र आहे. काहीही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे निवडणूक लढवणारच, पण ती कशी लढायची यावर आताच काही बोलणार नाही असं अंकिता पाटील (Ankita Patil) म्हणाल्या. आमच्यावर आतापर्यंत तीन वेळा अन्याय झाला, पण यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इंदापूर विधानसभेचे नेतृत्व अजित पवार गटाचे दत्ता भरणे करत असून त्यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे महायुतीतून उत्सुक आहेत. 

आमच्यावर तीन वेळा अन्याय

अंकिता पाटील म्हणाल्या की, इंदापूरचा कार्यकर्ता आमचा श्वास आहे. अद्यापपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही. तीन वेळा आमच्यावर अन्याय झाला. जागा वाटपाचा निर्णयात आतापर्यंत झालं नाही. जागावटपात काय होतंय हे महत्त्वाचा आहे. इंदापूर तालुका 2014 पर्यंत प्रगतीपथावरचा तालुका होता, आता तालुका वीस वर्षे मागे गेला आहे. या ठिकाणच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला, कोणतीही डेव्हलपमेंट झाली नाही. गुन्हेगारी वाढली आहे. 

हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणार 100 टक्के निश्चित. ते कसे लढतील यावर बोलणार नाही, पण आम्ही विधानसभा निवडणूक लढणार असं त्या म्हणाल्या.  

देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य

हर्षवर्धन पाटील एबीपी माझाशी संवाद साधताना म्हणाले की, महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे, पण इंदापूरच्या जागेसंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. कोणती जागा कुणाला जाणाऱ्या यावर आमचे वरिष्ठ चर्चा करतील. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकशाही आहे त्यांचा तो अधिकार आहे.  लोकसभेआधी आमचं असं ठरलं होतं की जो देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील तो फायनल असेल. अजून याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्या कार्यकर्त्यांवरती दहा वर्ष झलं अन्याय झाला आहे, त्रास झाला आहे  

वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिलाय

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुका हा राजकीय वजन असलेला तालुका आहे. इथला मतदार हुशार आहे. इथं लोकभावना स्पष्ट व्यक्त करतात, कुणावरही कोणताही दबाव नाही. कार्यकर्त्यांना मी अपक्ष लढावं असं का वाटतं हे याचं अजून मी अॅनालिसिस केलं नाही, पण त्यांची भूमिका समजावून घेईन. आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, अजून कोणताच निर्णय झाला नाही तर आम्ही काय बोलणार?

गेली दहा वर्ष मी कुठल्याही संविधानिक पदावर नसले तरी रोज तळागाळापर्यंत काम सुरू असते. मागच्या सहा महिन्यापूर्वी काही कामे मंजूर करून आणली होती त्याचे उद्घाटन आम्ही करतोय असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. निवडणुकीचे वातावरण आहे आणि आपल्याकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं असंही ते म्हणाले.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget