Sharad Pawar: अजित पवारांना इंदापुरात धक्का! प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश
Sharad Pawar: इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sharad Pawar: गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक जण पुन्हा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षामध्ये परतताना दिसत आहेत. अशातच इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश करणार आहेत. उद्या (शनिवारी) हा पक्षप्रवेश होणार आहे
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळेंना खासदारकी जाहीर झाल्यानंतर पक्षात काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी आपली भूमिका बदलली. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रवीण माने यांच्या घरी भेट देत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षासोबत असल्याचे जाहीर केले होते. आता प्रवीण माने हे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश शनिवारी दुपारी चार वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात होणार आहे.
प्रवीण माने पुन्हा एकदा करणार शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात प्रवेश
लोकसभा निवडणुकीआधी प्रवीण माने यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटातून अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात प्रवेश केला होता. उद्या पुण्यात प्रवीण माने पुण्यात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस थेट इंदापूरमध्ये आल्यानंतर प्रवीण माने यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षात प्रवेश केला होता.