एक्स्प्लोर

Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?

Pune Punit Balan : गणेश मंडळांना मालामाल करणारे आणि गावभर होर्डिंग्स लावणारे, पुनित बालन नेमके कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

पुणे :  पुण्यातील उद्योजक पुनित बालन  (Punit Balan) यांना पुणे महापालिकेकडून शहरभर अनधिकृत होर्डिंग्स (Punit Balan) लावल्याबद्दल 3 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांना दंड भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत पालिकेकडून देण्यात आली होती. त्यानंतर गणेशमंडळांनी त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड मागे घ्या अशी मागणी केली. सोमवारच्या बैठकीत या संदर्भात  निर्णय घेण्यात येणार असल्याचं पालिकेने सांगितलं आहे. मात्र या सगळ्यात गावभर होर्डिंग्स लावणारे आणि ज्यांच्यावर कोट्यावधींचा दंड ठोठावण्यात आला आहे. ते पुनित बालन नेमके कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

कोण आहेत पुनित बालन?

पुण्यात गणपती बघायला आल्यानंतर गणपती व्यक्तिरिक्त पुनित बालन यांच्या होर्डिंग्स सगळ्यांचं लक्ष वेधलं. पुनीत बालन हे प्रसिद्ध उद्योजक एस. बालन यांचे ते सुपुत्र आहेत. त्यासोबतच एक भारतीय उद्योजक, चित्रपट निर्माते, क्रिकेटर आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. आज अनेक क्षेत्रात पुनित बालन यांचं नाव घेतलं जातं. 

इंडियन आर्मी सोबत मिळून त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी दहा शाळा चालवायला घेतल्यात. प्रत्येक महिन्यात ते या सगळ्या शाळांचा आढावा घेत असतात. मागील काही वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील गणेशोत्सवाचा जवळचा संबंध दिसत आहे. हिंदूस्थानातील पहिला गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख आहेत. 2023 मध्ये कश्मिरमध्ये गणेशोत्सवाची सुरूवात त्यांनी केली आहे. 

रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांचे जावई

पुण्यात पुनित बालन ग्रुपच्या होर्डिंग्स सोबत आणखी एक ऑक्सिरिचचं नाव दिसतं. या दोघांचा काय संबंध असा प्रश्नही अनेकांना पडतो. तर माणिकचंद ग्रुपचे रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांची मुलगी जान्हवी धारीवाल या पुनित बालन यांच्या पत्नी आहेत. सोबतच त्या माणिकचंद ऑक्सिरिचची सीएमडीही आहेत. त्यामुळे पुनित बालन ग्रुपसोबत ऑक्सिरीचचे होर्डिंग पुण्यात सगळीकडे झळकतात.

फ्लेक्स चर्चेचा आणि गमतीचा विषय

अनेक वर्षांपासून पुनित बालन पुण्यातील विविध दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत करतात. या बदल्यात या मंडळांनी त्यांच्या भागात बालनच्या ऑक्सिरिच पाण्याच्या बाटल्यांचे ब्रँडिंग करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. शहरभर लावण्यात आलेले हे फ्लेक्स अनेकदा चर्चेचा आणि गमतीचा विषय ठरल्या आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक मीम व्हायरल झाले आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Sasoon hospital drug racket : बायको वकील, बसल्याजागी करायचा लाखोंचा व्यावहार; ससूनमधून पळालेल्या ललित पाटीलच्या ड्रग्स रॅकेटची A to Z कहाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूसCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Embed widget