एक्स्प्लोर

Vasant More resigns : गलिच्छ राजकारण आणि निष्ठेवर प्रश्नचिन्ह, वसंत मोरेंनी भडास काढली, पत्रात नेमकं काय काय लिहिलं?

Vasant More resigns : वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे: मनसेचे फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More resigns) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी आपलं राजीनामापत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामुळे मनसे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, वसंत मोरेंच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे.  माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती त्यांनी राज ठाकरे यांना पत्रातून केली आहेत.

वसंत मोरे यांनी लिहिलेलं राजीनामा पत्र जसेच्या तसे

प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोंडी करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.

धन्यवाद ।

आपला विश्वासू 

वसंत मोरे 

मध्यरात्री पोस्ट लिहून राजीनाम्याचे संकेत

दरम्यान, वंसत मोरे यांनी काल रात्रीच पोस्ट लिहून राजीनाम्याचे संकेत दिले होते. वसंत मोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता एक पोस्ट लिहिली होती. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आज थेट राजीनामा देऊन मनसेला जय महाराष्ट्र केला.  

शरद पवारांची भेट

वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार गटाच्या बैठका सुरु असताना त्यावेळी वसंत मोरे उपस्थित झाल्याने, त्याचवेळी चर्चेला सुरुवात झाली होती. वसंत मोरे मोठा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरु होती, ती आता खरी ठरली. 

संबंधित बातम्या   

मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा, मनसेच्या फायरब्रँड नेत्याचा राज ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला, आता ना कोणाकडे तक्रार ना अपेक्षा; वसंत मोरेंची खदखद, मध्यरात्री लिहिलेली ती पोस्ट नेमकी कुणासाठी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NDA Meeting Update : एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता कमी, अजित पवार मुंबईत असल्याची सूत्रांची माहितीABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : लाडक्या बहिणींचे १५०० देण्यासाठी भाऊ आणि नवऱ्यांना सरकार दारुडे करणार, राऊतांची सडकून टीकाShrirang Barne Allegations : पिंपरी चिंचवडचे पोलीस हफ्तेवसुली करतात, श्रीरंग बारणेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत
आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी.. कष्टाचे पैसे द्या, योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची सरकारकडे मागणी
Embed widget