एक्स्प्लोर

Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना काय सुनावलं?

भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरुन कोर्टात न्यायाधिशांनी पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे.

पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटीलचा (Lalit Patil) भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याच्या (Sasoon Hospital Drug Racket) साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. काल रात्री (10 ऑक्टोबर) उशिरा त्यांना विमानाने पुण्यात आणण्यात आलं आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  या दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं आहे. इतके दिवस ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आलं नाही आणि आता भूषण आणि अभिषेककडे आता काय तपास करणार,असं म्हणत पोलीस कोठडीची मागणी करणाऱ्या पोलीसांना न्यायाधीशांनी संतप्त होऊन पोलिसांना सुनावले. 

ललित पाटील पळून गेल्याने  मागील काही दिवसांपासून पोलीस खात्यावर आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे पोलीस कोठडी मागू नका, असंही यावेळी न्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी भूषण आणि अभिषेक या दोघांना न्यायालयाने तुमचे वकील कोण? असे विचारले असता आम्ही वकील दिलेले नाहीत, असं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले. न्यायालयात हजर असलेल्या वकिलांना तुमच्यापैकी कोणी या दोन आरोपींचे वकीलपत्र घेण्यास तयार आहे का? असं विचारलं. त्यानंतर न्यायालयात उपस्थित एक वकील आरोपींचे वकीलपत्र घ्यायला तयार झाले आहे.
 
भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पोलीसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कोणत्याही आरोपीला जास्तीत जास्त 14 दिवस पोलीस कोठडी देता येते. त्यामुळे ललित पाटील जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याच्यासोबत भूषण आणि अभिषेकची एकत्रित चौकशी करायची असेल तर त्याची 14 दिवसांची पोलीस कोठडी एकाचवेळेस संपवू नका, असं न्यायाधिशांनी पोलिसांना सांगितलं आहे.

ललित पाटील ड्रग्ज डिल करायचा...

भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे ललित पाटीलसोबत ड्रग्ज रॅकेट चालवत होते. त्यात ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा ड्रग्ज तयार करण्यात माहिर होता. त्यानं मेफेड्रोन ड्रग्ज कसं तयार करतात याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर हेच मेफेड्रोन अभिषेक बलकवडे भारतभर आणि भारताबाहेर विकायचा. या सगळ्या मेफेड्रोनचं डिल हे ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात बसून करत होता. 

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket : मोठी बातमी! ललित पाटीलचे विदेशातील ड्रग्ज माफियांशी संबंध; ललित नेपाळला पळून गेल्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget