एक्स्प्लोर

Pune Porshe car Accident : धनिकपुत्राला वाचवण्यासाठी मती गुंग करणारे उपद्व्याप; मध्यरात्री कार ससूनला आली, कर्मचाऱ्यासोबत पैशाची बोलणी, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी काय काय केलं?

पुण्यातील पोर्शे कार अपघातात आता नवनवे कारनामे समोर येत आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली. त्या अल्पवयीन मुलाशी मिळतेजुळते ब्लड सॅम्पल जमवले, अशा अनेक युक्त्या अपघाताच्या रात्री केल्याचं समोर आलं आहे.

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातात आता नवनवे (Pune Porshe car Accident) कारनामे समोर येत आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केली. त्या अल्पवयीन मुलाशी मिळतेजुळते ब्लड सॅम्पल जमवले, अशा अनेक युक्त्या अग्रवाल कुटुंब आणि ससूनच्या डॉक्टरांनी अपघाताच्या रात्री केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघातातील अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या सोबतच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचवण्यासाठी त्यांचे ब्लड सॅम्पल हे तिघांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले गेले तीन अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ब्लड ग्रुपची ज्यांचे रक्तगट जुळतात अशा तीन व्यक्तींना ससून मध्ये आणण्यात आलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

विशाल अग्रवालचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र हे दारु पिऊन नाहीत, हे सिद्ध करण्यासाठी हे ब्लड सॅम्पल मिळत्या जुळत्या व्यक्तींचे वापरण्याचा सल्ला डॉ. तावरेंनी दिला. याच सल्ल्यानुसार या तीन मुलांपेक्षा इतर मुलांचे नमुने घ्यायचं ठरलं आणि त्यानंतर मिळते जुळते रक्तगट असणाऱ्या तीन व्यक्तींना रुग्णालयात आणण्यात आलं. विशाल अग्रवालच्या मुलासाठी एका महिलेचं रक्त घेण्यात आलं आणि इतर दोघांसाठीदेखील दुसऱ्या व्यक्तीचं रक्त घेण्यात आलं आणि हेच सगळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी देण्यात आले.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता पुणे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. या तीन व्यक्तींचा आता पुणे पोलीस शोध घेत आहेत. हे तीन व्यक्ती सापडले तर या तिघांवरदेखील कारवाई होण्याची शक्यता आहे. हा सगळा प्रकार ससून रुग्णालयाच्या 40 नंबरच्या वॉर्डमध्ये घडलं आहे. अपघाताच्या रात्री दोन व्यक्ती कारमधून आल्या आणि त्यांनी अतुल घटकांबळे या ससूनच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला आणि पैशाची बोलणी केली आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे रक्त देणाऱ्या तीन व्यक्ती आणि त्या रात्री गाडीतून आलेल्या दोन व्यक्ती आता पुणे पोलिसांच्या रडारवर आहे.

या प्रकरणात आता रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहे. आधी पुणे पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणात ससून रुग्णालयातील ड़ॉक्टरांचा हात असल्याचं समोर आलं आणि दोन डॉक्टर आणि एक शिपाई यांना अटक करण्यात आली. आता या प्रकरणाचा खोलवर तपास सुरु आहे. या प्रकरणात कोणा कोणाचा समावेश आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पहा व्हिडीओ

इतर महत्वाची बातमी-

Exclusive : राज्यात पब आणि बारमध्ये 7 कठोर नियम लागू होणार, थोड्याचवेळात घोषणा; रात्री किती वाजेपर्यंत बार सुरु राहणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Drone on Manoj Jarange house: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावकऱ्यांची पोलिसांत तक्रार
मध्यरात्री आकाशात ड्रोनची घरघर ऐकू येताच मनोज जरांगे घराच्या गच्चीवर गेले अन्....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9:00AM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 JULY 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM:  02 JULY  2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  02 JULY  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तिसऱ्या दिवशीही इंद्रायणी फेसाळलेलीच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा पुन्हा फोल
Salman Khan Firing Case : 'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
'भाईजान'ला संपवण्यासाठी तुर्कीचे पिस्तुल, 25 लाखांची सुपारी; बिष्णोई गँगविरोधात आरोपपत्र दाखल
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Drone on Manoj Jarange house: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावकऱ्यांची पोलिसांत तक्रार
मध्यरात्री आकाशात ड्रोनची घरघर ऐकू येताच मनोज जरांगे घराच्या गच्चीवर गेले अन्....
Akshay Kumar :  हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Juhi Chawla On Shahrukh Khan : 'क-क-क किरण'कसा झाला  बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
'क-क-क किरण'कसा झाला बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Embed widget