Exclusive : राज्यात पब आणि बारमध्ये 7 कठोर नियम लागू होणार, थोड्याचवेळात घोषणा; रात्री किती वाजेपर्यंत बार सुरु राहणार?
पुणे 'हिट अॅण्ड रन' प्रकरणानंतर पब आणि बारसंदर्भाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बार आणि पबमुळे रात्रीचा धिंगणा होतो आणि त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघातदेखील झाले आहेत.

पुणे : पुणे 'हिट अॅण्ड रन' प्रकरणानंतर (Pune Porsche Car Accident) पब आणि बारसंदर्भाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बार आणि पबमुळे रात्रीचा धिंगणा होतो आणि त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघातदेखील झाले आहेत. पब आणि बार नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये पुण्यातील प्रकार रोखण्यासाठी महत्व पूर्ण निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. या पबवर कोणती कारवाई केली जाणार आणि नियम काय असतील यासंदर्भात माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
कोणती कारवाई, काय असतील नियम?
१) परवाना कक्षा मध्ये 21/25 वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार
२) हॉटेल च्या ओपन टेरेसवर ( rooftop) मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार.
३) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार
४) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना
४) महिला वेटरेस विहित वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना.
५) विनापरवाना मद्यसाठा मिळुन आल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे.
६) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड (Ban Party) परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-1 ट्रेड मधुन Cash andh Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.
७) या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या शिवाय स्थानिक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने परिसरातील पब आणि रेस्टोरंटमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची संरचना उत्पादन शुल्क विभागाकडून उभी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल अत्याधुनिक तंत्रज्ञान व CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टोरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इतर महत्वाची बातमी-
























