Ajit Pawar : 'मी अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो की...', अजितदादांच्या जबऱ्या चाहत्याने साकारला थेट शपथविधीचा देखावा
पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने आणि अजित पवारांच्या जबऱ्या फॅनने थेट अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा घरच्या गणपतीजवळ उभारला आहे
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने आणि अजित पवारांच्या जबऱ्या चाहत्याने थेट अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा घरच्या गणपतीजवळ साकारला आहे. तसेच अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी बाप्पाकडे साकडंही घातलं आहे. या देखाव्याची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. पुण्यातील नांदेड सिटीत राहणारे राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील यांनी राजभवनाची प्रतिकृती देकावा साकारला आहे.
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा राज्यात रंगत असल्याने त्यांनी हा देखावा उभारला आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, पवार साहेब, नितीन गडकरी, रामदास आठवले, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांची उपस्थिती दाखविली आहे. त्याचबरोबर काही बॉलीवूडचे अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान ,सलमान अमीर खान, रजनीकांत, नाना पाटेकर, अशोक सराफ अशा मराठी सिनेमातील अभिनेत्यांचा सुद्धा शपथविधीत सहभाग या देखाव्यात दाखवला आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि तरुण पिढीची ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे, त्यामुळे लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं बाप्पाचरणी घातलं आहे.
कसा साकारला देखावा?
हा देखावा साकार करताना त्याच्यामध्ये जाड पुठ्ठ्याचे शीट वापरले आहेत. डिझाईन केलेले फ्लेक्स, एलईडी लाईट, अजित पवार अर्थमंत्री असताना घेतलेले निर्णयाचा माहिती फ्लेक्स, लावण्यात आले आहेत. या देखाव्याची संपूर्ण पुण्यात आणि स्थानिक नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये या चर्चा होताना दिसत आहे.
आवडीनिवडीनुसार देखावे
पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की, देखाव्यांची परंपरा आलीच. मग त्यामध्ये हालते देखावे, जिवंत देखावे, धार्मिक, प्रबोधनात्मक, सामाजिक आदी विषयांवर देखावे सादर करण्याची मोठी परंपरा आहे. घरगुती गणेशोत्सवही याला अपवाद नाही. प्रत्येक नागरिक आपल्या आवडीनिवडीनुसार गणपतीसमोर देखावा साकारत करत असतात. त्याच प्रमाणे यांनीही हा देखावा साकारला आहे.
अजित पवारांचे भरपूर चाहते
पुण्यातच नाही तर पुणे जिह्यात अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते अजित पवारांचे मोठे फॅन आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करण्याचा हे कार्यकर्ते कायम प्रयत्न करत असतात. उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवारांचं पुण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत आणि रोड शो केला. त्यानंतर आता थेट बाप्पा चरणी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळू दे, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Ganeshotsav : देवेंद्र फडणवीसांचा आज पुण्यात 'मंडळ टू मंडळ' दौरा, दगडूशेठ चरणी होणार लीन