Pune Metro : पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला, चारचाकीचे मोठे नुकसान, जीवितहानी नाही
Pune News : पुण्यात मेट्रो स्टेशनचा ( Pune Metro Station) लोखंडी भाग कोसळल्याची घटना घडली.
Pune News : पुण्यात मेट्रो स्टेशनचा ( Pune Metro Station) लोखंडी भाग कोसळल्याची घटना घडली. पुण्यातील (Pune) येरवडा भागात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग स्टेशनच्या खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. महा मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला असून, नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू आहे.
मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कारवर पडला त्यावेळेस तिथे जर नागरिक असते तर दुर्दैवी घटना घडली असती. महा मेट्रोने येरवडा येथे सुरू असलेल्या स्टेशनच्या कामाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करावे. तसेच कामाच्या दर्जाची तपासणी करावी. या घटनेला नेमका कोणाचा निष्काळजी कारणीभूत आहे याची चौकशी करून कारवाई करावी. नागरिकांचा जीव अमूल्य असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू
येरवडा येथे महा मेट्रोच्या स्टेशनचे काम सुरू आहे. घटना नेमकी कशामुळे घडली. कोण जबाबदार. किती नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत.आम्ही या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना केलेल्या आहेत. असे असतानाही नेमके काय घडले हे चौकशी केल्यानंतर कळेल. सध्या तरी ही घटना घडली या व्यतिरिक्त कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे मत महा मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी व्यक्त केले. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरु असल्याचे सोनवणे म्हणाले.