लाडोबाचे लाड करती कोण? बाप कोर्टात म्हणाला,मी चावी देऊन चूक केली, आता आजोबा म्हणतात, मीच पोर्शेची चावी आणि क्रेडिट कार्ड दिलं!
विशाल अग्रवाल कोर्टात म्हणाले की मी चावी देऊन चूक केली, आता आजोबा सुरेंद्र अग्रवाल म्हणतात, मीच पोर्शेची चावी आणि क्रेडिट कार्ड दिलं. त्यामुळे लाडोबाला पोर्शेची चावी नक्की कोणी दिली? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
पुणे : आजोबा हे नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो असे म्हणतात. नातवंडं म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय. अगदी जीव की प्राण. ते वागतातच इतकं प्रेमाने तर कशाला नातवंडं घाबरतील त्यांना. पण हाच लाड इतरांच्या जिवावर उठणार नाही याची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. पुण्यात एका बिल्डरपुत्राने बेदरकारपणे कार चालवत दोन जणांचा चिरडून जीव (Pune Car Accident) घेतला. माझ्या मुलाला गाडी देऊन मी चूक केली?, अशी कबुली विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांनी पोलिसांसमोर दिली. मात्र आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. लाडोबाला चावी वडिलांनी तर आजोबांनी दिल्याची कबुली खुद्द सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Agrawal) यांनी पोलिसांना दिली आहे.
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात टीकेची झोड उडाल्यानंतर पुणे पोलीस सध्या अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने गुरुवारी (23 मे) चौकशी करण्यात आली. या चौकशीत लाडोबाला आजोबांनी चावी दिल्याचे कबुली दिल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने आजोबांन पार्टीला जाण्याअगोदर सांगितले होते. शनिवारी लेट नाईट मी आणि माझे मित्र बारावीच्या (cbse) निकालाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जात आहे. त्यानंतर मुलगा विशाल अग्रवालशी बोलून आजोबांनी पॉर्शे कारची चावी आणि पार्टी करण्यासाठी क्रेडिट कार्ड दिले. पार्टीचे बील भरण्यासाठी आजोबांनी हे कार्ड दिले.
आजोबाची पुणे आयुक्तालयात झाली चौकशी
लाडोबाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवालला पोलिस जबाबासाठी पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले होती. या प्रकरणी त्याने नातवाला कार चालवण्यासाठी मुभा दिली होती का, याबाबच चौकशी केली. चौकशीत आजोबा माझा नातू अल्पवयीन आहे, या वक्तव्यावर ठाम होता. तसेच माझा न्याव्यवस्थेवर विश्वास आहे, असे देखील म्हणाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही अग्रवाल कुटुबांची पैशाची मस्ती काही गेलेली नाही.
आजोबा की वडिल? नक्की चावी दिली कोणी?
काल विशाल अग्रवालच्या वडगावशेरीतील घराची झाडझडती देखील घेण्यात आली. बुधवारी विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्यात आली. विशाल अग्रवालला ज्यावेळी न्यायलयात हजर करण्यात आली त्यावेळी विशाल अग्रवालने न्यायालात चुकीत्या कृत्याची कबुली देत या विषयी खंत व्यक्त होती. तसेच मुलाला गाडी देऊन चूक केल्याचे देखील म्हटले होते. त्यामुळे आता नक्की चावी कोणी दिली वडिलांनी की आजोबांनी हे पोलीस तपासात समोर येईलच. तोपर्यंत लाडोबाचे लाड नक्की कोण पुरवत होते? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
Video :
हे ही वाचा :