इतकं होऊनही मस्तवालपणा जाईना, अग्रवालांच्या निकटवर्तीयांची पत्रकारांशी अरेरावी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन लावण्याची धमकी
सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पोलीस नेत असताना पत्रकार वारंवार छोटा राजनशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यावर काहीही न बोलता अगरवाल वारंवार आपला नातू अल्पवयीन असल्याचं बोलत होते.
पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाच्या मुजोरीचा अनुभव पुन्हा एकदा सर्वांना आला. या प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना चौकशी करण्यात आली. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेत असताना अगरवाल कुटुंबातल्या एकाने पत्रकारांशी अरेरावी करत धक्काबुक्की केली. दरम्यान सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पोलीस नेत असताना पत्रकार वारंवार छोटा राजनशी असलेल्या संबंधांवरून प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यावर काहीही न बोलता अगरवाल वारंवार आपला नातू अल्पवयीन असल्याचं बोलत होते.
कल्याणीनगर अपघातप्रकरणी गुरुवारी पुणे पोलिसांनी विशााल अग्रवालच्या घराची झाडाझडती केली. विशाल अग्रवालला सोबत घेऊन पोलिसांनी घराची झाडझडती घेतली. तर दुसरीकडे बिल्डररत्नाच्या आजोबांची देखील चौकशी केली. यावेळी आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि चालकाची समोरासमर बसून चौकशी केली. यावेळी सुरेंद्रकुमार याच्याबरोबर असलेल्या एकाने स्वत:ला वकील असल्याचे सांगत पत्रकारांशी अरेरावी केली.
अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का?
एका मराठी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेंद्र अग्रवाल असलेल्या या व्यक्तीने पत्रकार बाजूला असल्याचे लक्षात येताच 'हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का?' मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉलव्ह होईल, त्यांच्या नादी का लागत आहेत?' असे वक्तव्य केले होते. संध्याताळी परत याच व्यक्तीने पत्रकारांशी अरेरावी करत त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर काही वेळ पोलिस आयुक्तालय कार्यालयातील वातावरण गंभीर बनले आहे.
मुलाला वाचवण्यासाठी नवा कांगावा?
पोर्शे कारचा अपघात घडला तेव्हा ड्रायव्हर गंगाराम पुजारी शेजारी बसला होता. गुन्हे शाखेने त्याची चौकशी केलीय. बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अगरवालने मुलाला चालवायला परवानगी दिली, असा जबाब चालकाने पोलिसांना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल. त्यामुळेच पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
Video :
हे ही वाचा :
Pune Accident : अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं, म्हणाल्या, शेम ऑन Juvenile Justice Board!