Pune Accident News : पुण्यात चांदणी चौकातात भीषण अपघात; बस थेट 15 फूट खाली कोसळली अन्...
Pune Accident News : पुण्यातील अपघाताचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून कोसळली.
Pune Accident News : पुण्यातील (Pune News) अपघाताचं सत्र काही थांबायचं (Pune Accident News) नाव घेत नाही आहे. मुंबईकडून (Mumbai News) पुण्यामार्गे बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून कोसळली. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे जात होती. यावेळी बावधन परिसरात (Bavdhan) मुख्य रस्त्यावरुन सर्व्हिस रोडवर जात होती. त्यावेळी बसचालकाचं (Bus Accident) नियंत्रण सुटलं आणि बस थेट 15 ते 20 फुट खाली कोसळली. सुदैवानं या अपघातात एकाचाही मृत्यू झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात भीषण होता मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही बस मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरूकडे बायपासवरून साधारण 15 फूट खाली कोसळली आणि पलटली. या बसमध्ये 35 प्रवासी होते. यात एकूण 8 प्रवासी जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमी प्रवाशांना कोथरुडमधील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
वाहतूक विस्कळीत...
पुण्यातील चांदणी चौकाम कायम मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. पूल पाडूनही पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात काल रात्री 10 च्या सुमारास हा अपघात झाला. बस थेट पुलावरुन सर्व्हिस रोडवर जाताना कोसळली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या परिसरात कायम वर्दळ असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. शिवाय बसमध्ये 35 प्रवासी होते ते देखील घाबरलेल्या अवस्थेत होते. या सगळ्या प्रकारामुळे मुंबई- बंगळुरू हायवेववर चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताचं सत्र थांबेना
पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी भोर परिसरात एका बसने पेट घेतला होता. थोड्या प्रमाणात या आगीची चाहूल लागताच चालकाने सर्व प्रवाशांना बाहेर काढलं होतं. त्यानंतर बसमध्ये अचानक भडका उडाला होता. या चालकांच्या प्रसंगावधानामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे सगळ्यांकडून चालकांचं कौतुक करण्यात येतं. मात्र अपघात कधी थांबतील आणि नागरिक सुरक्षित प्रवास कधी करु शकतील, असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.