Lalit Patil drug case : नाशिकप्रमाणे पुण्यातही सुरू करायचा होता अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना; ललित पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवे खुलासे (Lalit Patil drug case) होताना दिसत आहे आणि त्यातच आता नवा आणि धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांंनी न्यायालयात केला आहे.
पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवे खुलासे (Lalit Patil drug case) होताना दिसत आहे आणि त्यातच आता नवा आणि धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांंनी न्यायालयात केला आहे. ललित पाटीलचा आणि त्याच्या भावाचा नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना होता. तसाच कारखाना त्या दोघांना पुण्यात सुरु करायचा होता, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
नाशिकप्रमाणे या प्रकरणातील आरोपींना पुण्यातही अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू करायचा होता. मात्र प्रकरण उघडकीस आल्याने त्यांचा डाव फसला. काल मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या 2 जणांना पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी ही माहिती समोर आली आहे. हरिश्चंद्र पंत याचा नाशिक येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचं समोर आलं होतं. त्यासोबतच इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला आरोपींनी मुंबईत मेफेड्रोनची विक्री केल्याचे निष्पन्न झालं आहे.
सगळ्यांची कसून चौकशी सुरु...
ललित पाटील प्रकरणात अनेकांची चौकशी सुरु आहे. त्यात आतापर्यंत पकडलेल्या सर्व आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत आहे प्रत्येकजण कोणत्या पद्धतीने काम करत होते. त्यांचा प्लॅन काय होता?, त्यांचं जाळं नेमकं कोणकोणत्या देशात पसरलेलं आहे? आणि या सगळ्यासोबत अजून या ड्रग्ज रॅकेटमध्ये कितीजण अडकलेले आहेत, याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून सुरु आहे.
डीन पदमुक्त तर देवकाते निलंबित...
त्यासोबतच या प्रकरणात ललित पाटीलला ससून रुग्णालयात साथ देणाऱ्यांचीदेखील चौकशी सुरु आहे. त्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात ससूनचे डीन संजीव ठाकूर आणि आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते हे दोषी आढळले आहेत. त्यामुळे संजीव ठाकूर यांमा पदमुक्त करण्यात आलं आहे तर देवकाते यांना निलंबित करण्यात आलं आहे. ड्रग माफिया ललित पाटीलला मदत केल्याचा ज्यांचावर आरोप होत होता ते ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीनं दोषी ठरवलं या समितीच्या अहवालानुसार ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते.
इतर महत्वाची माहिती-
Pune Crime News: नमाजासाठी गेलेल्या 9 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना