Sharad Pawar Gautam Adani: बारामतीत 'पॉवरफूल' कार्यक्रम; शरद पवार, गौतम अदानी यांच्या उपस्थितीत सायन्स पार्कचे आज उद्घाटन
Adani In Baramati : बारामतीमधील सायन्स पार्कच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध उद्योगती गौतम अदानी आज बारामतीत आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
Adani In Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत आज प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी उपस्थित राहणार आहे. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी गौतम अदानी बारामतीत हजेरी लावणार आहेत.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे.
राज्यभरात सध्या चर्चिला जात असलेल्या या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत. या माध्यमातून शालेय देशात पासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील प्रत्येक कुतूहल असणाऱ्या गोष्टीविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करु शकतील. तसेच त्यांच्यात लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागणार असल्याची माहिती राजेंद्र पवार यांनी दिली. या सायन्स पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आज समारोप होणार आहे.
शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न
भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी अशा स्वरुपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळेल. जपान, कोरिया आणि चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळं तेथील तरुण संशोधक टेलिकॉम, ऑटोमोबाईल, होम अप्लायन्सेस या क्षेत्रात भरीव प्रगती करत आहेत. याचमुळं कोडींग डेटा सायन्स डिजिटल मार्केटिंग डिझाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या सेंटरमध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.