Pimpari Chichwad Crime: पिंपरीतील अजित पवारांच्या माजी नगरसेवकाला गोळीबार प्रकरणात अटक, हॉटेलमध्येच गोळीबार अन्...
Pimpari Chichwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. काळेवाडी येथील नडेनगरमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबार प्रकरणी विनोद नढेसह सचिनला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकास पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. विनोद नढे असं त्यांचं नाव असून त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून चुलत भावाने भिंतीवर गोळी झाडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद नढे यांच्यावर निष्काळजीपणाचा आणि सचिन नढे वरती जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. (Pimpari Chichwad Crime)
नढे कुटुंबातील काका-पुतणे एका हॉटेलमध्ये पार्टी करत बसले होते. त्यावेळी एका काकांनी विनोद यांना फोन करून बोलावून घेतले. गणपती आरती करण्यासाठी मंडळाच्या भेटी घेत असतानाचं विनोद काकांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी तू काळजी घेत जा, पुण्यात माजी नगरसेवकाची नुकतीच हत्या झाली. याची आठवण विनोद यांना करून देण्यात आली. तेव्हा विनोद यांनी कंबरेला हात लावत मी आता बंदूक घेऊन फिरतो. तीच बंदूक सचिन ने पाहण्यासाठी घेतली आणि चेष्टेचेष्टेत भिंतीवर गोळी झाडली. गुरुवारच्या रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विनोद नढेसह सचिनला बेड्या ठोकल्या आहेत. सचिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.(Pimpari Chichwad Crime)
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार (Pimpari Chichwad Crime)केल्याची घटना घडली होती. काळेवाडी येथील नडेनगरमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबार प्रकरणी विनोद नढेसह सचिनला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. काळेवाडीमधील नडेनगरमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. हा गोळीबार नेमका कोणावर करण्यात आला, का केला असे प्रश्न निर्माण झाले होते. पण याप्रकरणी वाकड पोलिसांनी माजी नगरसेवक विनोद नढे आणि सचिन नढे यांना अटक केली आहे.(Pimpari Chichwad Crime)
तर या घटनेबाबत माहिती देताना पोलीसांनी सांगितलं की, सचिन नढे, विनोद नढे, तुकाराम नढे, माऊली नढे हे काळेवाडी पेट्रोल पंपासमोर असेलल्या राहुल बार अँड खुशबू हॉटेलमध्ये बसले होते. हॉटेलचे मॅनेजरला फटाक्यासारखा मोठा आवाज आला. त्यांनी जाऊन पाहिले असता सचिन नढेच्या हातामध्ये लोखंडी रिव्हॉल्वर (Pimpari Chichwad Crime) होते. त्याने लोखंडी रिव्हॉल्वरने जेवणाच्या प्लेट ठेवण्याच्या पत्र्याच्या सर्विस टेबलवर फायर केला. गोळीबार झाल्यानंतर हॉटेल मधील ग्राहक घाबरून पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विनोद नढे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत.