BJP workers Attack on Nikhil Wagle : पुण्यातील निखिल वागळे गाडी तोडफोड प्रकरण; भाजप शहराध्यक्षासह 43 आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल
पुणे : पुण्यातील निखिल वागळे गाडी तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कार्यकर्तेच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील निखिल (Nikhil wagle) वागळे गाडी तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्र सेवा दलाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या 43 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कार्यकर्तेच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन केल्या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. शनिवारी (9 फेब्रुवारी) भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निर्भया बनो कार्यक्रमस्थळी आमनेसामने आले होते.
'आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी, अशी मागणी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांना केली होती. मागील काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते. केवळ प्रसिद्धीसाठी वागळे हे सातत्याने अशी भाष्ये करून सवंग लोकप्रियता मिळवत असतात त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा वादग्रस्त माणसाचे भाषण पुण्यासारख्या शांतता प्रिय शहरात ठेवून पुण्याची शांतता बिघडवत असेल तर ते भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू असा कडक इशारा घाटे यांनी दिला होता.
त्यानंतर अनेक कार्यकर्ते राष्ट्रसेवा दलासमोर कार्यकर्ते जमले आणि त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. यावेळी निखिल वागळेंची गाडी फोडण्यात आली शिवाय त्यांच्यावर शाईफेकदेखील करण्यात आली. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत धीरज घाटे यांच्यासोबतच 43 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलांना मारहाण, पोलीस हात धरुन उभे- महिलांचा आरोप
या हल्ल्यात झालेल्या गोंधळात भाजपकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आम्ही पोलिसांतची मदत मागत होतो. मात्र पोलीस मदत करायला तयार नव्हते. भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या अंगावर धावून आल्याचा आरोपही महिलांकडून करण्यात आला आहे. काही महिलांना जखमादेखील झाल्या आहेत.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
