BJP workers Attack on Nikhil Wagle : निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, शाईफेक, अंडीफेक मात्र वागळे कार्यक्रमस्थळी पोहचले अन् भाषण केलं, संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता?
निखील वागळे यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना भाजपकडून निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांची गाडी फोडण्यात आली. शाईफेक झाली. या सगळ्या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम काय होता? पाहूयात...
पुणे : पत्रकार निखील वागळे (Nikhil waghle) यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन येत असताना भाजपकडून निखील वागळेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांची गाडी फोडण्यात आली. गाडीवर शाईदेखील फेकण्यात आली. "जय श्रीराम" , निखिल वागळे हाय हाय" अशी जोरदार घोषणाबाजी करत भाजपने शनिवारी निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र हा सगळा प्रकार झाल्यानंतर निखिल वाघळे यांनी वागळेंनी स्टेजवर भाषण केले. या सगळ्या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम काय होता? हा प्रकार कशामुळे घडला? पाहूयात...
कसा होता घटनाक्रम?
-निर्भय बनो या कार्यक्रमाचे पुरोगामी कार्यकर्त्यांकडून राज्यभरात आयोजन करण्यात आलं होतं.
- निखील वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे हे या कार्यक्रमातील वक्ते होते.
-निखील वागळेंनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या ट्वीटला भाजपकडून आक्षेप घेण्यात आला.
-9 फेब्रुवारीचा पुण्यातील साने गुरुजी स्मारकात आयोजित निर्भय बनो कार्यक्रमाचे करण्यात आले. मात्र हा कार्यक्रम उधळून लावू असं भाजपने जाहीर केले.
-भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून निखील वागळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.
-निखील वागळेंच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास पोलीसांनी सशर्त परवानगी दिली.
-सहा वाजता होणारा हा कार्यक्रम उधळून लावू, असे भाजपने जाहीर केले तर या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले.
-कार्यक्रमाच्या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
-9 फेब्रुवारीला सहा वाजता आयोजित कार्यक्रम सात वाजता सुरू झाला.
- निखील वागळे कार्यक्रमास येण्यासाठी पोलीसांच्या बंदोबस्तात निघाले.
-कार्यक्रमास पोहचण्याआधी निखील वागळेंच्या गाडीवर चारवेळा हल्ला करण्यात आला.
-दगड, शाई आणि अंडी फेकण्यात आली.
-निखील वागळेंच्या गडीला सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.
- यातील काही महिलांच्या चेहर्याला तर काहींच्या हाताला जखमा झाल्या आहेत.
-त्यानंतर निखील वागळेंची गाडी कार्यक्रमस्थळी पोहचली आणि वागळेंनी स्टेजवर भाषण केले.
महिलांना मारहाण, पोलीस हात धरुन उभे- महिलांचा आरोप
या हल्ल्यामुळे झालेल्या गोंधळात भाजपकडून महिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. आम्ही पोलिसांतची मदत मागत होतो. मात्र पोलीस मदत करायला तयार नव्हते. भाजपयुवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या अंगावर धावून आल्याचा आरोपही महिलांकडून करण्यात आला आहे. काही महिलांना जखमादेखील झाल्या आहे.