Baramati News : बारामतीत कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला; दोघे जखमी, गाड्यांचं नुकसान
बारामती तालुक्यात कारवाई करण्यासाठी (Baramati News) गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी 6 जणांच्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला.
बारामती, पुणे : बारामती तालुक्यात कारवाई करण्यासाठी (Baramati News) गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला आहे. 23 नोव्हेंबर रोजी 6 जणांच्या राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला करण्यात आला. संदर्भात बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क यांचे पथक बारामती तालुक्यातील माळेगाव गावचे हद्दीत विक्रमनगर येथे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर जमावाने पथकाला हातातील काठीने व दगडाने मारहान करुन शिवीगाळी केली. तसेच शासकीय व खाजगी वाहनांना दगड मारुन काचाफोडून नुकसान केले यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी किशोर जनार्धन धनगर पिंटु गव्हाणे यांसह अनोळखी 8 ते 10 इसमावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी विजय वसंतराव रोकडे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक दौंड यांनी फिर्याद दिली होती. झालेल्या हल्ल्यामध्ये पथकातील सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात भा.द. वि कलम 353, 333, 332, 324, 504, 506, 143, 147, 148, 149,427 सह सार्वजनीक संपत्तीस हानी प्रतिबंध अधि 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. कारवाई करायला गेले असता या पथकावर हल्ला करण्यात आला. यात एका पोलिसाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून चार ते पाच टाके पडले आहेत तर एका पोलिसाच्या तोंडाला जखम झाली आहे, असं फिर्यादी यांनी सांगितलं आहे. हल्ला करण्यासाठी आरोपींनी हत्यारं, लाकडी काठी आणि दगडांचा वापर केला आहे. आरोपींनी केलेला हल्ल्यात दोन गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकारी वाहन क्र MH-12 TK-9692, व खाजगी वाहन क्र MH-14-KF-8080 या दोन्ही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सहा जणांचं पथक कारवाई करण्यासाठी गेलं असता हा हल्ला करण्यात आला आहे.
वर्दीची भीती नाही...
मागील काही दिवसांपासून बारामती शहरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. रोज नवनवे गुन्हे समोर येत आहे. त्यात हल्ले, हत्या आणि मारहणीच्या घटनांमध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र तरीही गुन्हेगारी काही संपायचं नाव घेत नाही. त्यातच आता राज्य उत्पादन शुल्क पथकावर हल्ला केल्याने वर्दीची भीती उरली नसल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
इतर महत्वाची माहिती
Dhirendra Shatri : धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अंनिस आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी