(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : प्रचारावेळी अमोल कोल्हेंची पंचायत कोण करतंय? कोल्हेचा हल्ला; नाटकं करण्यात कोल्हे पटाईट, आढळरावांचा प्रतिहल्ला
शिरूर लोकसभेत प्रचारावेळी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेची अनेक गावांत पंचायत केली जात आहे. हे कार्यकर्ते अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पेरतायेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे, असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांकडे बोट दाखवलं.
शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील ( adhalrao Patil) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (amol kolhe) यांच्यात तू तू मै मै सुरुच असल्याचं चित्र आहे. डमी उमेदवार आणि डॅडी उमेदवार झाल्यानंतर आता पुन्हा एकदा एकमेकांवर निशाणा साधला आहे शिरूर लोकसभेत प्रचारावेळी शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेची अनेक गावांत पंचायत केली जात आहे. हे कार्यकर्ते अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पेरतायेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे, असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांकडे बोट दाखवलं. तर अशी नाटकं करण्यात कोल्हे पटाईत आहेत, हे सांगताना आढळरावांनी पलटवार केला.
खासदार झाल्यापासून कोल्हेचा मतदारसंघात जनसंपर्क नाही. हा मुद्दा विरोधकांकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला. त्यामुळं काही गावांमध्ये गावकरी कोल्हेंना घेरतायेत. पाच वर्षे कुठं गायब होता? खासदार म्हणून आमच्यासाठी काय केलं? आता आमच्या गावात कशाला येताय? आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या? अशा रोषाला अमोल कोल्हेंना सामोरं जावं लागतंय. तर काही ठिकाणी कोल्हे दिसताच मोदी-मोदी अशी घोषणाबाजी ही झाली. आढळराव त्यांचे कार्यकर्ते गावागावात पेरतायेत. त्यांच्याकडून असा उपद्व्याप केला जातोय अन त्याचे व्हिडीओ बनवून मतदारसंघात व्हायरल केले जातायेत. आढळराव हा रडीचा डाव खेळतायेत. मात्र अशी नाटकं करायची सवय कोल्हेंना आहे. गेल्या लोकसभेत मुंबईमध्ये त्यांच्या सांगण्यावरून मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यामुळं माणसं पेरायची सवय कोल्हेंची आहे, असा पलटवार आढळरावांनी केला.
व्हिडीओ व्हायरल करणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, हे अमोल कोल्हेंचं काम आहे. हा त्यांचा व्यावसाय आहे. आजपासून नाही तर अनेक दिवसांपासून अमोल कोल्हेंचा व्यावसाय आहे. मागच्यावेळीदेखील माझ्या तोंडून जातीवाचक विधान काढून घेतलं होतं. मात्र निवडणुकीच्या प्रचारात मी प्रचंड व्यस्त आहे. त्यामुळे असे निच काम करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. हे कामं त्यांनीच करावे, अशा स्पष्ट शब्दांत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना सुनावलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Amol Kolhe Vs Adhalrao Patil : शिरुरमध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंमध्ये तू तू मै मै सुरुच!
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती