एक्स्प्लोर
Advertisement
फडणवीस यांच्यासोबत हवापाण्याच्या गप्पा, भेटीबाबत अजित पवारांचं मिश्किल उत्तर
करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच एकत्र दिसले. या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारीच बसले होते आणि त्यांच्या हसत-खेळत 20 मिनिटं गप्पाही रंगल्या होत्या.
बारामती : "मी आणि देवेंद्र फडणवीस शेजारी बसलो म्हणजे लगेच काहीतरी सुरु झालंय, असं समजण्याचं कारण नाही. आम्ही शेजारी बसून हवापाण्याच्याच गप्पा मारल्या," अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भेटीचं मिश्कील वर्णन केलं. अजित पवार आज बारामतीमध्ये त्यांच्या निवासस्थानी होते. यावेळी त्यांनी बारामतीकरांच्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
सत्ता स्थापनेच्या हायव्होल्टेज नाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच एकत्र दिसले. करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न काल (8 डिसेंबर) माढ्यात पार पडलं. या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारीच बसले होते आणि त्यांच्या हसत-खेळत 20 मिनिटं गप्पाही रंगल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडेच होत्या.
'इकडची-तिकडची चर्चा केली...कसं काय पाऊसपाणी वगैरे'
अजित पवार म्हणाले की, "राजकीय व्यक्ती कधी कायमच एकमेकांचे दुश्मन नसतात. सत्ताधारी किंवा विरोधक एकत्र आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करतात. एकत्र बसतात, चर्चा होते. यात दुसरं काहीही नव्हतं. संजय शिंदे यांनी आग्रहाने मला आणि इतरांना बोलावलं होतं, म्हणून त्या लग्नाला आम्ही गेलो होतो. खुर्च्या ठेवताना अशा ठेवल्या की माझी आणि फडणवीस शेजारी शेजारी बसलो, इतकंच. त्यामुळे शेजारी बसल्यावर आम्ही थोडीफार इकडची-तिकडची चर्चा केली...कसं काय पाऊसपाणी वैगेरे."
लग्न संजय शिंदेंच्या मुलाचं, चर्चा मात्र अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या गप्पांची
देवेंद्रच्या मुलाखतीवर बोलणार नाही : अजित पवार
माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांबाबत अनेक दावे केले. याबाबत विचारलं असता, त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. "देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीवर काहीही बोलणार नाही, मला बारामतीची प्रचंड कामं आहेत, त्यांची कामं करणं हेच माझं एकमेव काम आहे. तेच मी करत राहणार आहे," अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांच्या मुलाखतीवर उत्तर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसंच खातेवाटपाबाबत मुख्यमंत्रीच काय ते अधिक विस्ताराने सांगू शकतील, असंही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement