एक्स्प्लोर

लग्न संजय शिंदेंच्या मुलाचं, चर्चा मात्र अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्या गप्पांची

26 नोव्हेंबर रोजी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परिणामी बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला आणि 80 तासात सरकार कोसळलं.

सोलापूर : सत्ता स्थापनेच्या हायव्होल्टेज नाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच एकत्र दिसले. करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न काल (8 डिसेंबर) माढ्यात पार पडलं. या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारीच बसले होते आणि त्यांच्या हसत-खेळत 20 मिनिटं गप्पाही रंगल्या होत्या. त्यामुळे लग्न संजय शिंदे यांच्या मुलाचं असलं तर सगळ्यांच्याच नजरा फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडेच होत्या. महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेबाबत चर्चा आणि बैठकीचं सत्र सुरु असतानाच, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राज्यातील सत्तापेचात मोठा ट्विस्ट आला होता. स्थिर सरकारसाठी एकत्र आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांनी बंड केल्याचं स्पष्ट झालं. मात्र राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. यानंतर दोन दिवस अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. अखेर 26 नोव्हेंबर रोजी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परिणामी बहुमत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला आणि 80 तासात सरकार कोसळलं. या सगळ्या घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आलं. मात्र ही भेट संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने झाली. संजय शिंदे हे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह सोहळा सोलापुरात संपन्न झाला. यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. यावेळी पवार आणि फडणवीस यांनी एकाच कोचवर बसून मनसोक्त गप्पा मारल्या. अजित पवार जेवण करुन पुण्याकडे तर देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना झाले. मात्र या लग्नात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 20 मिनिटांच्या गप्पांचीच चर्चा अधिक रंगली.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget