एक्स्प्लोर

Ajit Pawar Pune : पुण्यात कार्यक्रमात पवार काका-पुतण्यांनी शेजारी बसणं टाळलं? आसनव्यवस्थेची नेम प्लेट का बदलली? अजित पवारांनी सांगितलं कारण

Ajit Pawar Pune : अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा दिसून आल्या. शरद पवार आणि अजित पवारांच्या यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले असल्याचं दिसून आलं.

पुणे: आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची (Vasantdada Sugar Institute) 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पडला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar), दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा दिसून आल्या. शरद पवार आणि अजित पवारांच्या यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले असल्याचं दिसून आलं, त्यानंतर आता अजित पवारांनी या वेगळ्या बसण्यामागचं कारण सांगितलं आहे.

या कार्यक्रमानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, 'असं काहीच नाही बाबासाहेबांना शरद पवार साहेबांसोबत बोलायचं होतं मी केव्हाही बोलू शकतो. म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं, मी तिथं असलो तरी मला बोलता येत होतं. माझा आवाज मोठा आहे. दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला देखील ऐकायला जातो. त्यामुळे ही काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये बाबासाहेब पहिल्यांदाच सहकार मंत्री झाले आहेत, त्यांना साहेबांशी चर्चा करायची होती, त्यामुळे ते मध्ये बसले होते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. 

साहेबांचे आणि तुमची चर्चा काय झाली 

साहेबांची आणि तुमची चर्चा काय झाली? या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, या व्यवसायाच्या करता जे महत्वाचे प्रश्न आहेत. त्याचे स्वतः मी सुतोवाच केले त्याच्याबद्दल आमच्या चर्चा झाली, त्यामध्ये सहकार खातं होतं, एक्साईज खातं होतं, कृषी खातं होतं आणि ऊर्जा खातं होतं या चार विभागाचा संबंध या इंडस्ट्रेशन येतो, या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारचा डिपार्टमेंटचा संबंध येत असे अजित पवार यांनी सांगितले.

अजितदादा शरद पवारांच्या शेजारी बसणार होते, पण...

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र, त्यांच्या जागी बदल करण्यात आला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यभागी बसले होते. बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील हे दोन्ही एकत्रित एकाच व्यासपिठावरती आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांना इग्नोर केल्याचं पाहायला मिळालं होतं. आज देखील या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या बाजुला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
Embed widget