ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी
शबाना आझमी यांच्या कारला मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी जावेद अख्तर हे देखील कारमध्ये उपस्थित होते.

पिंपरी : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या कार अपघातात जखमी झाल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांचा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी शबाना आझमी यांचे पती ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्याच मागे असलेल्या कारमध्ये होते.
अपघातात शबाना आझमी यांच्या नाकाला आणि तोंडाला मार लागला आहे. त्यानंतर त्यांना तातडीने पनवेल जवळील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शबाना आझमी यांच्या गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. शबाना आझमी मुंबईहून लोणावळा येथे जात होत्या त्यावेळी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. लोणावळ्याला कार्यक्रमानिमित्त की विकएंडसाठी निघाले होते हे अद्याप समजू शकलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
