एक्स्प्लोर

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, दीर- भावजयचा अपघाती मृत्यू; तपासणीसाठी जाताना कार भरधाव वेगात आली अन्...

Pune Accident: भरधाव वेगात महिंद्रा एसयूव्ही कार थांबलेल्या बस व इतर वाहनांना भरधाव वेगात ओव्हर टेक करत असताना दुचाकी आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

पुणे: पुणे विमानतळानजीक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याची माहिती आहे, या अपघातामध्ये दीर-भावजयचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चार चाकी  गाडीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात (Pune Accident) झाला, या घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (गुरुवारी) येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला आहे. अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला तर,  त्यांच्या भावजय रेश्मा रमेश गोवेकर (वय 66) यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली असून कारचालकाचे अचल कुमार नरेंद्र कुमार प्रसाद असे नाव आहे. अपघातानंतर कारचालक स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. (Pune Accident) 

अपघातातील मयत आशीर्वाद गोवेकर व रेश्मा गोवेकर यांचे नाते दीर, भावजय असे आहे. रेश्मा यांची तब्येत बिघडल्याने एअर फोर्सच्या ईसीएच रुग्णालयात आशीर्वाद गोवेकर सकाळी दुचाकी वरुन घेऊन आले होते. उपचार घेतल्यानंतर दोघेही दुचाकीवरुन घरी निघाले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर येरवडा ते विमानतळ या मुख्य रस्त्यावरून उजवीकडे चौकाकडे वळत होते. दुचाकी वळण घेतं असताना येरवड्याच्या दिशेने जाणारी बस व इतर वाहने थांबली होती. याच दरम्यान फाईव्ह नाइनच्या दिशेने भरधाव वेगात महिंद्रा एसयूव्ही कार थांबलेल्या बस व इतर वाहनांना भरधाव वेगात ओव्हर टेक करत असताना दुचाकी आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. 

अपघात इतका भीषण होता की, आशीर्वाद गोवेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर रेश्मा गोवेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत जवळील ईसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रेश्मा यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये दुचाकी, चार चाकी गाडीचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा मयत रेश्मा यांच्या मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,  रेश्मा गोवेकर यांची मुलगी येरवड्यातील धानोरी परिसरात राहते. त्याच्याकडे या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. रेश्मा यांचे पती हे आर्मीमध्ये होते. त्यामुळे त्या पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पुण्यात मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या. तसेच, दीर आशीर्वाद हे गोव्यात सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करतात. ते पुण्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले होते. गुरुवारी सकाळी धानोरीतून आर्मी हॉस्पिटल, वानवडीत तपासणीसाठी दुचाकीवरून जात होते. तर कार ही पुण्याहून विमानतळाकडे जात असताना जुन्या विमानतळ मार्गावरील 509 चौकातील म्हसोबा मंदिर परिसरात भरधाव आलेल्या कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली, यामध्ये आशीर्वाद हे उडून रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर रेश्मा यांना वानवडीतील आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले. दुपारी दोनच्या दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. पुढील तपास विमानतळ पोलिस स्टेशन करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Embed widget