एक्स्प्लोर
मुंबई-पुणे हायवेवर अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने गाडी नाल्यात कोसळली!
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी तीन झाडांना धुडकली आणि नाल्यामध्ये कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत.
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी तीन झाडांना धडकली आणि नाल्यामध्ये कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत.
सांदीपान भगवान शिंदे असे अपघातातील मृताचं नाव आहे, तर सुभाष जगताप, किसन जठार, मुक्तराम तावरे असे तीन जखमींची नावं आहेत. जखमींना तात्काळ निगडी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीस कोणतेही अडथळे निर्माण झाले नाहीत. वाहतूक सुरळीत सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement