एक्स्प्लोर
चाकण हिंसाचार : कारवाईला वेग, आणखी 20 जण ताब्यात
बस स्थानकात एसटी पेटवणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली गेली. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावाबाबत आणि कारवाईच्या ठिकाणाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.

पुणे : चाकण हिंसाचार प्रकरणात आणखी 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. बस स्थानकात एसटी पेटवणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली गेली. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावाबाबत आणि कारवाईच्या ठिकाणाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी झाल्यानंतर दोषींना अटक केली जाईल. त्यानंतरच आरोपींची नावे समोर आणली जाणार आहेत. याआधीही अठरा जणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांवर हल्ला करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, चाकणमध्ये बाहेरून आलेले, झोपडपट्टी परिसर आणि आसपासच्या गावातील हुल्लडबाज यांचा पहिल्या दिवशी ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. चाकणमध्ये काय घडलं होतं? काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलं. चाकण बंद दरम्यान मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात एसटी बसेसची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. तसंच काही ठिकाणी पोलिसांवरही हल्ले करण्यात आले होते.
आणखी वाचा























