एक्स्प्लोर

Prataprao Jadhav: महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

Prataprao Jadhav on COVID-19 Cases : कोरोना काळात मागच्या वेळीसारखा त्रास लोकांना यावेळी होऊ नये, यासाठी आमचं विभाग पूर्ण तयार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे. 

Prataprao Jadhav on COVID-19 Cases : राज्यासह देशात काही ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग, आयुष विभाग यासाठी तयार आहे. लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने मोठं काम केलं आहे. आरोग्य विभागाने सर्व राज्याचे आरोग्यमंत्री, सचिव यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या वेळीसारखा त्रास लोकांना यावेळी होऊ नये, यासाठी आमचं विभाग पूर्ण तयार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिली आहे. 

कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यासह भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) 76 नव्या रुग्णांची भर पडली असून आता 425 अॅक्टिव कोरोना रूग्णांची संख्या आहे. तर मुंबईत 27 पुण्यात 21, आणि ठाण्यात 12 अॅक्टिव रूग्णांची संख्या आहे. तर देशभराचा विचार केला तर, देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या 1 हजार 200 पर्यंत पोहोचली आहे. याच विषयी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे.

खोटं औषध विकत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई- प्रतापराव जाधव  

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर सुप्रीम कोर्टाने देखील चिंता व्यक्त केली होती. कोर्टाने सरकारला यावर उपाययोजना करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही हे पोर्टल बनवण्याचा निर्णय घेतला. सरकारचा संकल्प आहे की देशात सुरू असलेल्या फसव्या जाहिराती रोखल्या जाव्यात. यासाठी राज्य सरकारला अधिकार दिले आहेत. हे पोर्टल बनवल्यामुळे देशभरात कुठेही तक्रार आली तरी ती सोडवण्यासाठी फायदा होईल. यामुळं लोक देखील हुशार होतील आणि कोणी खोटं औषध विकत असेल तर त्यावर आम्ही आणि आमचा विभाग लक्ष ठेवून कारवाई करू, अशी माहिती ही मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी दिली आहे.  

140 दिवस उलटूनही केस व नख गळतीच्या रुग्णांचा अहवाल गुलदस्त्या

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक अजब प्रकार उघडकीस आला होता. या परिसरातील जवळपास 20 ते 22 गावातील नागरिकांना अचानक केस गळतीचा व टक्कल पडण्याचा त्रास सुरू झाला. "एबीपी माझा"ने सर्वात प्रथम ही बातमी उजेडात आणल्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागं झालं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेल्या आयसीएमआरच्या (ICMR) पथकाला या परिसरात संशोधन करण्यासाठी पाठवलं. लाखो रुपये खर्च करून आयसीएमआरच पथक या परिसरात आलंही. त्यांनी रुग्णांचे नमुने ही घेतले. मात्र अद्यापही आयसीएमआरचा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामुळे मात्र आयसीएमआर च पथक फक्त पर्यटनासाठी तर नाही आलं नव्हतं ना...? असा सवाल उपस्थित राहत आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग ही उदासीन, अहवाल अद्याप गुलदस्त्यात

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रकार संपतो न संपतो तोच या परिसरात केस गळती झालेल्या रुग्णांची नख गळती सुद्धा झाली होती. त्याही वेळेस केंद्राने तात्काळ एक आपत्कालीन पथक या परिसरात अभ्यासासाठी पाठवलं होतं. मात्र या पथकाचाही अहवाल अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आयसीएमआर चे पथक व केंद्राचा आकस्मित पथक या भागात पर्यटनासाठी तर नाही पाठवलं होतं...? जिल्हा व आरोग्य प्रशासन याबाबतीत उदासीन आहे. सरकारला नागरिकांच्या आरोग्याची काळजी नाही का...? असे सवाल आता उपस्थित राहत आहे.

हे ही वाचा 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
LPG Gas Shortage: हॉटेल-दुकानं बंद, कुठे लाकडी भट्टी सुरु; धाराशिव, सोलापूर, सातारामध्ये महत्वाचे निर्णय, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती, A टू Z माहिती
धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह, बीड जिल्ह्यात खळबळ, चिंचा खाण्याच्या नादात दुर्घटना घडल्याचा संशय
Horoscope Today 11 March 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! बाप्पाच्या कृपेने विघ्न टळणार, आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य वाचा..
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! बाप्पाच्या कृपेने विघ्न टळणार, आर्थिक चणचण संपेल, आजचे राशीभविष्य वाचा..

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget