एक्स्प्लोर

Wardha Lok Sabha: वर्ध्यात रामदास तडस कुटुबांत वादाचा तडका; सासरा विरुद्ध सून लढत रंगणार

Wardha Lok Sabha : वर्धा मतदारसंघात खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. म्हणूनच या राजकीय  लढाईला मिळणाऱ्या वळणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे

वर्धा: वर्धा मतदारसंघात लोकसभा  (Wardha Lok Sabha)  निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे.  भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस (Ramdas Tadas) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पुजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पुजा तडस (Pooja Tadas)  यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा पंकज तडस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत हा अर्ज अद्याप परत घेतला गेला नाही.  सुनेचे पुजा पंकज तडस (शेंदरे)असे नाव असून अर्ज वैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा मतदारसंघात खासदार सासऱ्याविरुद्ध सून निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. म्हणूनच या राजकीय  लढाईला मिळणाऱ्या वळणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पूजा आणि पंकज यांच्या विवाहाचे किस्से एकेकाळी बरेच गाजले होते. आज घडीला या मतदारसंघात नेहमीच्या राजकीय लढाई व्यतिरिक्त सासऱ्याविरुद्ध सून अशी लढत देखील रंगणार  असल्याचे चित्र आहे.

पूजा यांच्यामागे भक्कमपणे नेमके कोण?

खासदारांच्या सून असलेल्या पूजा तडस यांच्या उमेदवारीने  मतदारसंघात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. दरम्यानच्या काळात  पूजा यांच्यावर, आपल्या लहान मुलाला घेऊन एकटे, कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर, मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई लोकशाही मार्गाने लढली जात असल्याचा दावा केला जात आहे. राजकीय क्षेत्रात या उमेदवारीनचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. एकीकडे, तडस कुटुंबातील वाद यानिमित्ताने चर्चेत आला असतानाच पूजा यांच्यामागे नेमके कोण भक्कमपणे उभे आहे, हाही प्रश्न वर्धेच्या राजकारणात विचारला जाऊ लागला आहे.

सत्ताकारणांच्या सारीपाटात नेमका विजय कुणाचा?

या सत्ताकारणांच्या सारीपाटात नेमका विजय कुणाचा होतो हे जरी आज स्पष्ट होत नसले तरी पुन्हा एकदा महिला सक्षमीकरण या मुद्द्यावर विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महिला म्हणून नामांकन दाखल करणाऱ्या तडस यांच्या सुनेने मात्र या उमेदवारी दाखल करून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा :

Pankaj Tadas: पत्नी पूजा तडस यांचे गंभीर आरोप, बाळ कुणाचं, DNA टेस्टची मागणी का? पंकज तडस म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget