एक्स्प्लोर

''उद्धव ठाकरे वडीलस्थानी, आम्हाला पदरात घ्यावं''; विशाल पाटलांनी सांगितलं निवडणूक का लढलो

सांगलीतील जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला होता. अखेर दिल्ली दरबारी हा वाद संपुष्टात आला. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली.

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूक यंदा काही मतदारसंघात चांगलीच रंगत पाहायला मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या जागावाटपत सर्वात डोकेदुखी आणि वादाची जागा म्हणजे सांगली लोकसभा (Sangli Losabha) मतदारसंघ होता. कारण, या मतदारसंघातून शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस आणि शिवसेनेत काहीसा वाद रंगला होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली होती. तर, पुढील काही दिवसांत अधिकृत उमेदवार म्हणूनही घोषणा केली. त्यामुळे, काँग्रेसच्या जागेवर इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांची नाराजी झाली. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पाठिशी विश्वजीत कदम (Vishwajeet kadam) ठामपणे उभे राहिले. निवडणूक निकालानंतर पाटलांची विशाल जीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या विजयानंतर उद्धव ठाकरे हे आम्हाला वडिलस्थानी आहेत, त्यांनी आम्हाला पदरात घ्यावं, असं विश्वजीत कदम यांनी एबीपी माझावरील माझा कट्टामध्ये बोलताना म्हटलं आहे. 

सांगलीतील जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला होता. अखेर दिल्ली दरबारी हा वाद संपुष्टात आला. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे, सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या तिकीटावर चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली. तर, भाजपच्या संजय काका पाटील यांचे त्यांना आव्हान होते. मात्र, येथील जागेवरुन दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनीही अपक्ष खिंड लढवली. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी पडद्यामागून विशाल पाटील यांना मदत केली. 4 जून रोजी लागलेल्या निकालामुळे पाटलांच्या विशाल जीतमागे विश्वजीत ठामपणे उभे राहिल्याचं दिसून आलं. विशाल पाटील 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजयी झाले. मात्र, या निकालामुळे एकप्रकारे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं उघड झालं. त्यामुळे, शिवेसना पक्षाच्या नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी प्रचारात ते बोलूनही दाखवले होते. मात्र, महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता हा विरोध काहीसा मावळला आहे. त्यातूचन आपण लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेणार असल्याचं विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरे आम्हाला वडिलस्थानी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे, संपूर्ण महाराष्ट्राला कै. बाळासाहेबांबद्दल आदर आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. सध्याच्या राजकारणात ते ज्या संघर्षातून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत, त्यांना मानलंच पाहिजे. आमच्यासाठी महाविकास आघाडीचे ते नेते आहेत. पण, मी म्हणतो नेत्यापेक्षा ते आमच्यासाठी वडिलस्थानी आहोत. आम्ही दोघंही त्यांच्या मुलासारखे आहोत. कदाचित काही समज-गैरसमज असतील. पण, आम्ही त्यांचे आशीर्वाद मागत आहोत, त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, पदारात घ्यावे, असे म्हणत लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेणार आहोत, असे विश्वजीत कदम यांनी म्हटले. त्यामुळे आम्ही मातोश्रीवर जाऊन लवकरच त्यांची भेट घेणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. त्यासाठी, आम्ही वेळ मागितली आहे, असा गौप्यस्फोट विश्वजीत कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

म्हणून मी निवडणूक लढवली - पाटील

निश्चितच उद्धव ठाकरेंना भेटावं लागणार आहे, आम्ही दिल्लीत गेलो तेव्हा महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आम्ही संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी, त्यांनीही हा विषय संपल्याचं म्हटलं. कारण, विशाल पाटील हे काँग्रेस परंपरेचे आहेत, म्हणजे आपल्या महाविकास आघाडीचेच आहेत. त्यामुळे, हा विषय आता संपल्याचं त्यांनी म्हटलं, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. माझी लढाई माझ्या पक्षाची, माझ्या वैयक्तिक अस्तित्वाची होती. त्यामुळे ही लढावं लागणार होती, कारण भाजपचा पराभव करणे आवश्यक होते, असे विशाल पाटील यांनी म्हटले.   

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania on Rupali Chakankar: नाशिकला जाताना रुपाली चाकणकरांनी वाटेतच गाडी बदलली, अंजली दमानियांची एसआयटीकडे मोठी मागणी; म्हणाल्या, 'त्या वकिलांना...'
नाशिकला जाताना रुपाली चाकणकरांनी वाटेतच गाडी बदलली, अंजली दमानियांची एसआयटीकडे मोठी मागणी; म्हणाल्या, 'त्या वकिलांना...'
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Todays Breaking News: अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, 9 मंत्र्यांसह घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
Thalapathy Vijay Profile: तामिळनाडू अखेर 'विजयी पथावर', साऊथ सुपरस्टार ते प्रस्थापितांना धूळ चारत 'राजकीय धुरंधर' ठरलेले थलपती विजय कोण?
तामिळनाडू अखेर 'विजयी पथावर', साऊथ सुपरस्टार ते प्रस्थापितांना धूळ चारत 'राजकीय धुरंधर' ठरलेले थलपती विजय कोण?
Tamil Nadu Oath Ceremony: कंटेंट क्रिएटर्स, डॉक्टर... एक महिला आमदारासह 9 जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, तामिळनाडूचे विजयचे आगळेवेगळे मंत्रिमंडळ, पाहा यादी
कंटेंट क्रिएटर्स, डॉक्टर... एक महिला आमदारासह 9 जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, तामिळनाडूचे विजयचे आगळेवेगळे मंत्रिमंडळ, पाहा यादी

व्हिडीओ

Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price: अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
अमेरिका इराण युद्धाचा सोने-चांदी दरावर परिणाम; सोने तब्बल 30 ते 40 हजारांनी स्वस्त, चांदीचे भावही कोसळले
Trisha Krishnan on CM Vijay Oath Ceremony: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली....
Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्...; आरोपी 'लिफ्ट' घेऊन पसार, नाशिक हादरलं!
Delhi Terrorist Attack Alert: दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करण्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
राजधानी दिल्लीला दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, भाजपच्या कार्यालयासह महत्त्वाच्या जागांवर हल्ल्याचा कट, सुरक्षा यंत्रणांकडून चोख बंदोबस्त
IPL 2026 Points Table : आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
आयपीएलमध्ये तगडा ट्विस्ट! गुजरातची थेट दुसऱ्या स्थानी झेप; तर पंजाब अन् आरसीबीला मोठा शॉक, राजस्थान टॉप-4 मधून OUT
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Embed widget