![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे तुम्ही दाखवून दिलं : जयंत पाटील
Jayant Patil on Vijaysinh Mohite Patil, सोलापूर : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे हेळसांड करणाऱ्या सरकारला महाराष्ट्रात धडा शिकवायचं काम आपल्याला करायचे आहे.
![विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे तुम्ही दाखवून दिलं : जयंत पाटील Vijaysinh Mohite Patil You have shown how the wave is under the leadership of Vijaysinh Mohite Patil says Jayant Patil Maharashtra Politics Marathi News विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे तुम्ही दाखवून दिलं : जयंत पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/04/bab6c5a87708d5b933225a62ccb7e6151725471123198924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jayant Patil on Vijaysinh Mohite Patil, सोलापूर : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे हेळसांड करणाऱ्या सरकारला महाराष्ट्रात धडा शिकवायचं काम आपल्याला करायचे आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने माढा विधानसभेमध्ये मताधिक्य दिले तसेच विधानसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा रहा. विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे तुम्ही दाखवून दिलं", असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. ते टेंभूर्णी येथे बोलत होते.
तुम्ही सरकारकडे कपडे मागितले तरी कपडे देखील काढून देतील
जयंत पाटील म्हणाले, लोकसभा झाल्यानंतर सरकार जाग झालं, सरकार घाबरलं. सरकारनं तिजोरीचं दार उघडलं नाही तर बाजूला काढून ठेवलं. सरकार मिळेल त्या गोष्टी देत आहे. तुम्ही सरकारकडे कपडे मागितले तरी कपडे देखील काढून देतील. तुमचा मोठेपणा आहे ते तुम्ही मागणार नाही. सरकार फार मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहे. निवडणूका कशा पुढे नेता येतील हे पाहात आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी आज सुरक्षित नाहीत. जाईल त्या ठिकाणी आठवड्यातून दोन आठवड्यातून अतिशय घृणास्पद प्रकार समोर येतात. शाळेतील लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत.
पंधरा सेकंदात माणसे येतात आणि गोळ्या घालून पळून जातात
या सरकारला राज्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवता आली नाही. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे. पुणे शहरामध्ये नगरसेवकाचा खून झाला. तुम्ही ती क्लिप बघा पंधरा सेकंदात माणसे येतात आणि गोळ्या घालून पळून जातात. महाराष्ट्रामध्ये चाललय काय नागपूरमध्ये गृहमंत्र्यांचा जिल्हा त्या ठिकाणी पोलीस जुगार खेळताना सापडले. पोलीस स्टेशनमध्ये कसा आधी ऐकले का म्हणजे या महाराष्ट्राचे पूर्ण वाट लावण्याची सरकारने ठरवले.
महाराष्ट्र मराठवाड्यात प्रचंड पाऊस झालाय. सरकार इव्हेंट करण्यात गुंतलं. सरकारचे तिकडे लक्ष नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका आपटे नावाच्या मुलाला करायाला दिला. त्या आपटेने फूट दीड फुटाच्या वर पुतळा केला नव्हता. त्याला 28 फुटाचा पुतळा करायला दिला तो पुतळा आठ महिन्यात कोसळला. ज्या बाजूला वारा येतोय त्याच बाजूला पुतळा कोसळला. म्हणे वाऱ्याने पुतळा कोसळला. महाराष्ट्रात मराठी माणसं काही मान्य करतील पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि पुतळा उभा करण्यामध्ये झालेली अक्षम्य चूक माफ करणार नाही. याचं प्रायश्चित्त सरकारला द्यावं लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या
जाऊ दे रे गाडी... आजपासूनच गाड्या सुरू होणार; संपाबाबत मंत्री उदय सामंतांनी दिली अपडेट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)