Vijay Wadettiwar : पंतप्रधानांना अजूनही कॉंग्रेसची भिती, वडेट्टीवारांचा मोदींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra) अस्मितेला धक्का देण्याचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जर त्यांच्या भाषणात 50 वेळा कांग्रेसचं (congress) नाव घेत असतील, तर त्यांना कांग्रेसची भिती अजूनही आहे. संसदेत राजकीय भाषण करत असताना असं वक्तव्य करणं हे वेदनादायी आहे" असे वक्तव्य आज राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी केले आहे, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
ट्रम्प यांच्या माध्यमातून भारतात कोरोना आला - वडेट्टीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देण्याचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातून कोरोना पसरल्याचा आरोप पंतप्रधानांनी संसदेत केला. राजकिय भाषणातून त्यांना ही टिका करता आली असती. मात्र संसदेचा असा वापर करणं योग्य नाही. परदेशातून कोरोना आला. पहिला रुग्ण सापडल्यानंतर ट्रम्प यांचा कार्यक्रम गुजरातला झाला. त्यावेळी खचाखच गर्दी होती. लॉकडाउन नंतर करु, पण तरीही कार्यक्रम घेण्यावर मोदींचा भर होता. ट्रम्प यांच्या माध्यमातून देशात कोरोना आला असा आरोप वडेट्टीवारांनी यावेळी केला. विमान वाहतूक पहिलीच बंद केली असती तर एवढा प्रसार झाला नसता असे सांगत वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
कुंभमेळ्याचा खेळ कोणासाठी होता?
वडेट्टीवार पुढे म्हणतात, हरिद्वार येथे कुंभमेळा झाला. कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी 93 लाख लोकांची उपस्थिती होती. हा खेळ कोणासाठी सुरु होता? लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचं वातावरण होतं. पायी जाण्यास लोकं निघाली. अनेक लोकं ट्रेनच्या पटरी वरती चालत असताना अनेकांचा जीवही गेला. महाराष्ट्रातून जी लोकं गेली, त्यांना त्या राज्यात घेतलं जात नव्हतं. लोकांना घरी पोहचवण्यासाठी आम्ही 93 कोटी रुपये खर्च केले. कामगारांना त्यांच्या मुळ गावी पाठवत असताना त्याची वैद्यकीय तपासणी आम्ही केली. त्यानंतरच आम्ही त्यांना पाठवलं. हे सर्व करत असताना मोदी केवळ राजकीय द्वेष मधून बोलत आहे.
गुजरातमध्ये कोरोना मृत्युचा आकडा लपवला
आम्ही कोणतीही आकडेवारी लपवली नाही. गुजरातमध्ये 10 हजार मृत्यु दाखवले आणि 82 हजार लोकांना मदत देण्यात आली याचा अर्थ आकडा मोठ्या प्रमाणात लपवले. कांग्रेस वरती आरोप करुन मत मागत आहेत. महाराष्ट्रातील लोकांशी द्वेशाने वागू नका. शरद पवार यांच्या संदर्भात कौतुक करण्यासारखे काम आहे. लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार हा कांग्रेसने दिला आहे. त्यामुळे मोदींना बोलण्याचा अधिकार नाही. असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
गिरे तो भी टांग उपर, सोमय्यांवर घणाघात
व्हिडीओ समोर आहे त्यामुळे किरीट सोमय्यांना कोणी पाडलं हे त्यात स्पष्ट आहे. गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे
महत्त्वाच्या इतर बातम्या :
भाजपला 18 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी : सुप्रिया सुळे
किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणारा शिवसैनिक गजाआड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha