एक्स्प्लोर
Zero Hour Manoj Jarange on Election : GR काढला,पण समित्या गठित केल्या नाही;निवडणुकीबाबत मोठा निर्णय
एबीपी माझावरील चर्चेत मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले. 'मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र वितरीत करेपर्यंत पोलीस भरतीसारख्या सर्व सरकारी भरत्या पुढे ढकलाव्यात,' अशी थेट मागणी त्यांनी केली. सरकारने हैदराबाद गझेटियरच्या आधारे जीआर काढल्याबद्दल जरांगे पाटलांनी समाधान व्यक्त केले असले तरी, प्रमाणपत्र वाटपासाठी समित्या गठीत न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरचे स्वागत करताना अंमलबजावणीतील दिरंगाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंतिम मुदत ३० जूनवरून मार्चपर्यंत आणावी आणि त्यात राष्ट्रीयीकृत बँकांसोबतच सहकारी बँका व पतसंस्थांचाही समावेश करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे आणि दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
All Shows
झीरो अवर

Zero Hour FULL EP : भुजबळांसह ओबीसी नेते आक्रमक, राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पुन्हा तीव्र होईल?

Zero Hour Bhaskar Jadhav | कोकणात का पडतेय जातीय समीकरणांची गरज?

Zero Hour Full EP : युतीसंदर्भात वेळ आल्यावर सांगेन, राज ठाकरेंच्या वक्तव्याचा अर्थ काय? सखोल चर्चा

Zero Hour Full : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज, वाचाळवीर मंत्र्यांना लगाम बसणार? ABP MAJHA

Zero Hour Full EP : देवेंद्र फडणवीस नवे शरद पवार? दिल्लीत जाण्याची शक्यता किती? सखोल चर्चा
Advertisement
Advertisement























