एक्स्प्लोर

Vidhan parishad Election 2024 : काँग्रेस आमदारांचं विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग? विजय वडेट्टीवार म्हणाले...

Maharashtra Vidhan parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याची चर्चा आहे. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले आहे.

Maharashtra Vidhan parishad Election 2024 : आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार असून 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. त्यातच विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP Ajit Pawar Camp) काँग्रेसचे 4 आमदार आणि भाजपने (BJP) काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चा आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी फेटाळल्या आहेत. 

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर, काँग्रेसने प्रज्ञा सातव, तर शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना शिंदे गटाने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. 

आमचे आमदार फुटणार हे कुठून आणलं?

काँग्रेस आमदार विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणार का? अशी विचारणा केली असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदानाला सुरुवात झाली आहे. ⁠⁠आमचे नऊ आमदार फुटणार हे कुठून आणलं? गैरसमज करण्याचे धंदे अजूनही बंद झाले नाहीत. ⁠आमचे आमदार हलवण्याची वेळ आली नाही. ज्यांना मतं फुटतील अशी भिती आहे त्यांनी आमदारांना हॉटेलला ठेवले. ⁠आमचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. ⁠जे आमदार बोलले ते आमच्या सोबत होते.  त्यांचा गैरसमज झाला आहे. हवा आमच्या बाजूने आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

असे आहे पक्षीय बलाबल

महायुतीमध्ये भाजपचे 103, शिवसेनेचे 40 आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) 1 आमदार, बहुजन विकास आघाडी 2 आमदार असलेल्या एनडीएचा भाग आहे.  प्रहार जनशक्ती पक्ष 1, इतरांसह, महायुतीचा वाटा 203 वर आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेस (37), शिवसेना ठाकरे गट (16), राष्ट्रवादी शरद पवार गट (12), समाजवादी पक्ष (2), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (1) आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा 69 आमदारांचा पाठिंबा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Vidhan Parishad election Live Updates : शिंदे गटाचे शाहाजी बापू आजारी, मतदानाला येण्याबाबत प्रश्नचिन्ह; एका मतामुळे नेमका काय ट्विस्ट येणार?

Vidhan Parishad Election 2024 : विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंचा कुणाला पाठिंबा? समोर आली मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget