![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा, अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात
Maharashtra Politics: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता विधानपरिषदेची निवडणूक 26 जूनला होणार आहे. तर 1 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
![Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा, अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात Vidhan Parishad Election 2024 Shivsena Thackeray Camp announce candidates Anil Parab and J M Abhyankar for graduate and teachers constituency election Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा, अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/04128f5c605e16adfa771835f07af1941716602617972954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Camp) उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून आतापासूनच विधानपरिषद निवडणुकीची (VidhanParishad Election 2024) मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विधान परिषदेच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.
ज. मो. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. त्यांना शिवसेनेने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे.
विधानपरिषद निवडणुकीचे नवे वेळापत्रक जाहीर, निकाल कधी?
यापूर्वी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका या 10 जून रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, मे महिन्याच्या सुट्टीसाठी अनेक शिक्षक गावी गेल्याने या काळात निवडणूक घेणे उचित ठरणार नाही, असे सांगत शिक्षक संघटनांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता विधानपरिषद निवडणुकीचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 26 जूनला विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडेल. त्यानंतर 1 जुलै रौजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. यानिमित्ताने महायुती आणि महाआघाडीत पुन्हा एकदा राजकीय लढाई रंगताना पाहायला मिळेल. लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो, यावरही शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील बरीच समीकरणे अवलंबून असतील.
विधानपरिषद निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना 31 मे 7 जून या काळात उमेदवारी अर्ज भरता येतील. त्यानंतर 10 जूनपर्यंत या अर्जांची छाननी केली जाईल. 12 जून ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी: कोकण पदवीधर मतदारसंघातून वैभव खेडेकर महायुतीचे उमेदवार? मनसैनिक राज ठाकरेंना भेटणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)