Vidhanparishad Election: मोठी बातमी: कोकण पदवीधर मतदारसंघातून वैभव खेडेकर महायुतीचे उमेदवार? मनसैनिक राज ठाकरेंना भेटणार
graduate constituency election: पदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
खेड: पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्या असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे. राज्यातील चार मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीकडून यावेळेस मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी करताना यासंदर्भात कोकणातील प्रमुख मनसेचे पदाधिकारी लवकरच मुंबईत जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वैभव खेडेकर हे मनसेचे कोकणातील फायर ब्रँड नेते आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कामांमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा असतो. कोकणातील अनेक महत्त्वांच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक होत लोकांना न्याय दिला आहे. विशेष म्हणजे वैभव खेडेकर हे तरुणांचे आयडॉल आहेत, सुशिक्षित तरुणांमध्ये तसेच सुशिक्षित वर्गामध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीचा मोठा ठसा पाहायला मिळतो, वैभव खेडेकर यांनी विद्यार्थी सेनेमधूनच राजकारणात प्रवेश केलेला आहे.
वैभव खेडेकर हे पदवीधर आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेपासून काम करत असताना कोकणात तरुणांची मोठी फळी त्यांनी तयार केली आहे. कोकणातील स्थानिक पातळीवरती वैभव खेडेकर यांच्या कर्तुत्वाचा कार्याचा आणि समाजसेवेचा हात इतर कोणीही धरू शकत नाही. कोकणात अशी एकही व्यक्ती नाही जी वैभव खेडेकर या व्यक्तिमत्त्वाला ओळखत नाही त्याच्यामुळे माहितीला या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. आता कोकण पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने वैभव खेडेकर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
शाळांना सुट्ट्या, शिक्षक गावाला; शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी
मुंबई, कोकण, नाशिक शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. 15 जून पर्यंत शाळांना सुट्टी असताना 10 जूनला अनेक शिक्षक परगावी असल्याने याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.
मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात येत्या 10 जूनला या चार जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. या संबंधित तारखा काल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, दहा जूनला निवडणुका घेतल्यास मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
१५ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी आहे. त्यामुळे अनेक शिक्षक सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबईबाहेर आहेत. सुट्ट्यांमध्ये काही परराज्यातील शिक्षकांचे आधीच रिझर्वेशन असल्याने हजारो शिक्षक मुंबई नसतील. सोबतच ज्या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या कामाला लावण्यात आले आहे त्यांनी २० जून नंतर परगावी जाण्यासाठी आधीच रिझर्वेशन केले आहे. अशा परिस्थितीत 10 जूनला शिक्षकांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक घेणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने घेतली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर निवडणुका घेतल्यास मतदानाचा टक्का तर वाढेल. शिवाय अनेक शिक्षकांना मतदानाचा आपला हक्क बजावता येईल, असं शिक्षक संघटनेचे म्हणणं आहे.
आणखी वाचा