एक्स्प्लोर

Vasant More : पवारांसोबतची 'ती' दोन मिनिटांची भेट निर्णायक ठरली? वसंत मोरे आता शरद पवार गटात जाणार का? 

Vasant More Resigns MNS : पुणे मनसेची ताकद अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला असून तो पक्षासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

पुणे : लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंच्या मनसेला (MNS Raj Thackeray) मोठा धक्का बसला असून फायरब्रँड नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांनी राजीनामा दिला आहे. पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी आधी एका फेसबुक पोस्टच्या (Vasant More Facebook Post) माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामागे त्यांनी घेतलेली शरद पवारांची (Sharad Pawar) दोन मिनिटांची ती भेट निर्णायक ठरली का असा प्रश्न विचारला जात आहे. राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का याचीही उत्सुकता पुणेकरांना आहे.

मनसेमध्ये कुचंबना, राज ठाकरेंनाही सांगितलं होतं 

वसंत मोरे हे मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. तीन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यांच्या कामाचा जसा धडाका तसाच त्यांचा स्वभावही बेधडक. त्यामुळेच कुणालाही कधीही अडचण असो, वसंत मोरे त्या ठिकाणी पोहोचणारच अशी त्यांची ख्याती. पण गेल्या काही काळापासून त्यांची मनसेमध्ये कुचंबना होत असल्याचं दिसून येत होतं.

मनसेमध्ये होणारी कुचंबना त्यांनी राज ठाकरेंच्या कानावरही घातली होती. वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची समजूतही काढली होती आणि त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय केलं. 

लोकसभेसाठी इच्छुक, पण पक्षाकडून प्रतिसाद नाही (Pune Lok Sabha Election) 

पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण पक्षाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. उलट राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना लोकसभेची तयारी करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आधीच नाराज असलेले वसंत मोरे अधिकच नाराज झाले होते. वसंत मोरे यांनी त्यावेळीही एका पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे टीका केली होती. 

आताही पक्षाचा राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी मंगळवारी मध्यरात्री एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की,  एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. 

शरद पवारांची ती दोन मिनिटांची भेट

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला अचानक वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांसोबत दोन मिनिटे चर्चा करून ते निघून गेले. ही भेट सामाजिक कामासाठी असल्याचं वसंत मोरे यांनी जरी सांगितलं असलं तरी त्या दोन मिनिटांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का? वसंत मोरे हे शरद पवरांसोबत जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena  Supports Sachin Sanap :अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं पत्र काढलं, पुणे शिक्षकमध्ये अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा, भाजप सेना आमने सामने 
अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं पत्र काढलं, पुणे शिक्षक निवडणुकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
आमचा विजय निश्चित! एकनाथ शिंदेंनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं आवाहन 
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Devendra Fadnavis : जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तोपर्यंत निर्णय संसदेत होतील, हा भारत आहे, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश नाही, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं...
संविधानामुळे भारताच्या लोकशाहीला कोणी हात लावू शकलं नाही, सत्ता निवडणुकीतून बदलेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget