यांना लग्नातही बोलावू नये, 35 पुराणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे म्हणाले, भाडोत्री जनता पक्ष मी एवढ्यासाठीच म्हणतोय त्यांच्याकडे त्यांच्या पक्षातील कोणीच नाही. सगळे आयात केलेले आहेत. ते म्हणत आहेत इतके पार्टी तितके पार त्यांना माहिती नाहीत की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते.
![यांना लग्नातही बोलावू नये, 35 पुराणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका Uddhav Thackerays indirect criticism on Devendra Fadnavis in jogeshwari east jansavad sabha of Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Maharashtra Politics Marathi News यांना लग्नातही बोलावू नये, 35 पुराणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचं भांडणं लावतील, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/28b797702e6a9e740b2d139f563998901709998848753924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : "भाजपची वाईट खोड आहे. यांना लग्नातही बोलावू नये. हे 35 पुरणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचे भांडण लावतील", अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray ) यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे यांची जोगेश्वरी पूर्व परिसरात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
भाडोत्री जनता पक्ष मी एवढ्यासाठीच म्हणतोय त्यांच्याकडे त्यांच्या पक्षातील कोणीच नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, भाडोत्री जनता पक्ष मी एवढ्यासाठीच म्हणतोय त्यांच्याकडे त्यांच्या पक्षातील कोणीच नाही. सगळे आयात केलेले आहेत. ते म्हणत आहेत इतके पार्टी तितके पार त्यांना माहिती नाहीत की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. चार दिवसांपूर्वी भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव आहे. शहाचं नाव आहे. ज्याच्यावर मालमत्ता जमा केली म्हणून भाजप बोंबलत होता त्या कृपाशंकर सिंगचा नाव मात्र गडकरींचं नाव नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली आहे.
शेवटी हे गद्दार ते गद्दारच
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचे काही गद्दार फोले म्हणून शिवसैनिक आपल्याकडे येतील, असं यांना वाटलेलं. मात्र, तुम्ही अंधेरी जोगेश्वरी आणि उत्तर पश्चिम जिल्हा मतदारसंघातील पहा शिवसैनिक फुटणार नाहीत. तानाजी मालुसरे बाजीप्रभू हे नाव घेतल्यावर निष्ठावंत असं म्हटलं जातं. शेवटी हे गद्दार ते गद्दारच हे का गेले ते माहीत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
रवींद्र वायकरांच्या उपस्थितीने वेधलं लक्ष
गेल्या काही आठवड्यांपासून रवींद्र वायकर यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरुच आहे. त्यानंतर रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चाही सुरु झाल्या होता. मात्र, आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे रवींद्र वायकरांच्या मतदारसंघात पोहोचले. त्यावेळी रवींद्र वायकरही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे सध्या तरी रवींद्र वायकरांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)