एक्स्प्लोर

VIDEO : गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Devendra Fadanvis : नटसम्राटासारखं वागलं म्हणजे कुणी नटसम्राट होत नाही, नाहीतर कट्यार काळजात घुसलीच म्हणून समजा असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

पुणे: गाढवाला कितीही चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच, संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ओवीत हेच सांगितलेलं आहे. सध्याच्या राजकीय धुराळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेतंय हे सर्वांनाच माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलतोय याची तुम्हाला कल्पना आहेच असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीका केली. पिंपरी चिंडवडमधील विकास कामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी ही टीका केली. 

नटसम्राटासारखं वागू नका, नाहीतर कट्यार काळजात घुसेल

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुकाराम महाराजांच्या नावाने पिंपरीमध्ये नाट्यगृह होत आहे ही त्यांना दिलेली सांस्कृतिक वंदना आहे. अलिकडच्या काळात नाट्यगृहाच्या बाहेरच जास्त नाटकं होतात. मानापमानाच्या गोष्टी होतात, मनातील कथाकथन रचले जातात, खोटे नाटे आरोप होतायेत. त्यामुळे संशयकल्लोळ सुरू आहे. पण जनता सुज्ञ आहे.  नटसम्राटासारखं वागलं म्हणजे नटसम्राट होता येत नाही हे काही लोकांना सांगायचं आहे. तसं केलं तर कट्यार काळजात घुसणार हे नक्की. शेवटी आमच्या एकनाथ शिंदेंनी डंपर पलटी केलाच आहे. 

पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शहरांच्या विकासाची दिशा कशी आहे याची माहिती दिली. शहरांच्या विकासामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखता येईल, प्रदूषण कसे कमी करता येईल याची माहिती त्यांनी दिली. 

अजित पवार गटावर भाजपच्या आमदार महेश लांडगेंची टीका 

राज्यातील सत्तेत असलेल्या अजित पवार गटावर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेली वीस वर्ष या समाविष्ट भागांकडे दुर्लक्ष झालं. 1997 ते 2017 या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना या समाविष्ट गावांसाठी झालेल्या विकासाची टॅली करावी आणि भाजप सत्तेत आल्यानंतर म्हणजे, गेल्या सात वर्षांतील विकास कामांचा अभ्यास करावा. भाजप सत्तेत आल्यानंतर या ठिकाणी पाच हजार कोटींचा विकास झाला. आमदार अण्णा बनसोडे आपल्याला भूतकाळात जायचं नाही, यात कोणी दुर्लक्ष केलं यावर मला भाष्य करायचं नाही. पण भाजप या समाविष्ट गावांचा कायापालट करत आहे.

ही बातमी वाचा :

VIDEO : Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : गाढवाला चंदन लावलं तरी उकिरड्यावर जाऊन..., ठाकरेंवर टीका

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल
Maharashtra Live News Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे आणि मुंबईतील गोळीबार घटनेची गंभीर दखल
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: शुभमदादा आम्ही बदला घेतला, हल्ला करताच सगळे जोरजोरात ओरडले; काय काय म्हणाले?, मंदार किवळेने पोलिसांना सगळं सांगितलं!
शुभमदादा आम्ही बदला घेतला, हल्ला करताच सगळे जोरजोरात ओरडले; काय काय म्हणाले?, मंदार किवळेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Yogesh Kadam on Pune Mandar Kiwale Case: मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Yogesh Kadam on Pune Mandar Kiwale Case: मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Embed widget