(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Speech : 'कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार', पीएम मोदींच्या ऑफरवरुन उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल
Uddhav Thackeray Speech, Chhatrapati Sambhajinagar : काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ऑफर दिली होती.
Uddhav Thackeray Speech, Chhatrapati Sambhajinagar : "काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ऑफर दिली होती. दरम्यान पीएम मोदींच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. "नेमकं तुम्ही ठरवा काय करायचे आहे ते, आजपर्यंत तुम्ही सर्व फोडलतं. शिवसेना फोडली-तोडलीत. राष्ट्रवादी फोडली-तोडलीत तरी कधी मला डोळा मार आणि पवारांना डोळा मार, आज सकाळी पवारांना डोळा मारला. एकीकडे म्हणायचे नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि आता म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा" असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला की काय?
उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुम्ही मला नकली संतान म्हणतात, अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला की काय? जसं तुम्ही अदानीला सगळं विकलय तसाच तुमचा आत्मा सैतानाला विकलेला दिसतोय. अशी थेर कशाला करत आहात. आपली युती तुटली आहे, असा निरोप तुम्ही 2014 ला तुम्ही एकनाथ खडसेंमार्फत निरोप पाठवला होता. त्यावेळी आमच्या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही पंतप्रधान झाला होतात. तेव्हातर मी युती तोडली नव्हती. तेव्हा तुम्ही युती तोडली. तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला वाटलं असेल? शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन दाखवेन, असा शब्द मी शिवसेना प्रमुखांना दिला आहे. तो शब्द देखील तुम्ही तोडलात.
तुम्ही चेलेचपाट्यांना घेऊन माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काल तुमचं माझ्यावर प्रेम उतू चाललं होतं. म्हणालात की ऑपरेशनचा सल्ला दिला. हे सगळचं झूटचं आहे. तुम्ही माझी चौकशी करत होतात. तेव्हा मी हाता पायांची हालचाल करु शकत नव्हतो. त्याच वेळेला तुम्ही चेलेचपाट्यांना घेऊन माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली, तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला वाटलं असेल? त्यांचे आशीर्वाद असते तर आज महाराष्ट्राने गुढगे टेकवावे लागले नसते.
आज जालन्यात जाणार होतो मात्र पाऊस आला आणि हेलिकॉप्टर उडणे शक्य नव्हते म्हणून रद्द केला. जालनाच्या नागरिकांची माफी मागतो. जालन्यात 5 टर्म म्हणजे 25 वर्ष ते खासदार आहेत, त्यात जालन्यात मतदान कार्ड कचऱ्यात सापडले.कदाचित लोकांना प्रश्न पडले असेल कशाला याला निवडून द्यायचे. संभाजीनगरात दारू वाला हवाय की पाणीवाला हवाय? जालन्यात आता रावसाहेबना विचारावे आता तरी जाणार का, आता तिथं कल्याण पाहिजे कल्याण करायला. महाराष्ट्राने मोदीजींना झुकवले आहे, शहेनशहासारखे सध्या ते फिरत आहेत. तुम्ही माझा पक्ष पळवला,चिन्ह चोरले माणसे फोडली तरी तुम्हाला उद्धव ठाकरेंनी भीती वाटते, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या