Vaibhav Naik on Ravindra Waikar : मोठ्या निष्ठेच्या गोष्टी सांगत होतात, 'जेल की भाजप'च्या मुद्यावरुन वैभव नाईकांचा रवींद्र वायकरांवर हल्लाबोल
Vaibhav Naik on Ravindra Waikar : "मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला.
![Vaibhav Naik on Ravindra Waikar : मोठ्या निष्ठेच्या गोष्टी सांगत होतात, 'जेल की भाजप'च्या मुद्यावरुन वैभव नाईकांचा रवींद्र वायकरांवर हल्लाबोल Vaibhav Naik on Ravindra Waikar Stories of great loyalty are told, Vaibhav Naik attacked Ravindra Waikar on the issue of 'Jail or BJP' Maharashtra Politics Marathi News Vaibhav Naik on Ravindra Waikar : मोठ्या निष्ठेच्या गोष्टी सांगत होतात, 'जेल की भाजप'च्या मुद्यावरुन वैभव नाईकांचा रवींद्र वायकरांवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/ffcd90785a3dc162b6350f2212fd42091715352712981924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vaibhav Naik on Ravindra Waikar : "मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासमोर तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते. जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला. नियतीने अशी वेळ कोणावरही आणू नये", असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी खदखद व्यक्त केली. दरम्यान, शिंदे गटाने उमेदवारी देऊनही रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडल्याबाबत खंती व्यक्ती केली. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता याबाबत उद्धव ठाकरेंचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले वैभव नाईक?
वैभव नाईक म्हणाले, रवींद्र वायकरांनी सागितलं की, जेल की भाजप हा पर्याय माझ्याकडे होता. पण हा पर्याय आमच्या सर्वांसमोरच होता. मी, राजन साळवी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे राहिलेल्या आमदारांसमोर देखील हाच पर्याय होता. खासदार असूदेत की, सामान्य शिवसैनिक असूदेत, त्यांना यातूनचं जावे लागले आहे. परंतु, स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्यापैकी कोणीही बदलले नाही. निश्चितपणे रवींद्र वायकर हे निष्ठेच्या मोठ्यामोठ्या गोष्टी सांगत होते. उद्धव ठाकरेंसोबत राहून त्यांनी अनेक पदं भूषवली. परंतु आता ते स्वत:च्या स्वार्थासाठी शिंदेंबरोबर गेले आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. शिवसैनिकही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. त्यामुळे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना सहानुभूती मिळणार नाही. त्यांनी स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, त्यामुळे मशालचं निवडून येणार आहे.
रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी
नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. दरम्यान, जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला, असं म्हणणारे रवींद्र वायकर ठाकरेंना छुपी मदत करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण शिंदे गटात प्रवेश करतानाही रवींद्र वायकर यांच्या चेहरा पडलेलाच दिसत होता. त्यामुळे शिंदे गटातून निवडणूक लढताना वायकर जोर लावणार की, छपी मदत करणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय.
इतर महत्वाच्या बातम्या
Govinda and Uddhav Thackeray : मै तो रस्ते से जा रहा थाsss उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची वाट अडली, 20 मिनिटे आडोशाला थांबला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)