पाच शिवसैनिकांचा विजय पक्का, ठाकरेंचे शिवसैनिक वि. शिंदेचे शिवसैनिक 5 मतदारसंघात एकमेकांसमोर
Thackeray Shivsena vs Shinde Shivseana : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आज (दि.28) शिंदेंच्या शिवसेनेनेही पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.
Thackeray Shivsena vs Shinde Shivseana : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आज (दि.28) शिंदेंच्या शिवसेनेनेही पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून एकनाथ शिंदे यांनी 8 उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, 5 ठिकाणी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने असणार आहेत. त्यामुळे 5 शिवसैनिकांचा विजय पक्का असणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केवळ 8 उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिक, कल्याण, ठाणे अशा अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणे एकनाथ शिंदे यांनी टाळले आहे.
कोणत्या मतदासंघात शिवसैनिक आमने-सामने?
जवळपास 4 लोकसभा मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंचे शिवसैनिक आमने-सामने असणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मुंबईतील एका जागेवर दोन्ही शिवसेना आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणाला कोठून उमेदवारी ?
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हेमंत पाटील यांच्याविरोधात ठाकरेंचे नागेश पाटील आष्टीकर लढणार आहेत. तर बुलढाण्यात शिंदेंनी प्रतापराव जाधव यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात ठाकरेंकडून नरेंद्र खेडेकर लढणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना मैदानात उतरवले आहे. वाघेरेंविरोधात शिंदेंनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे.
शिर्डीसाठी शिंदेंचा उमेदवार जाहीर
आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये वारंवार शिर्डीच्या जागेची मागणी केली होती. मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी शिर्डीतून उमेदवार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदेंनी शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात त्यांची लढत असणार आहे.
महाराष्ट्रासाठी आम्ही लढणार आणि जिंकणारच! pic.twitter.com/81WiErMJjb
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 27, 2024
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी#Shivsena pic.twitter.com/PGgRhVMrhK
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) March 28, 2024
इतर महत्वाच्या बातम्या