एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची 23 एप्रिलला जळगावच्या पाचोऱ्यात सभा, ठाकरे गटाकडून टीझर रिलीज

Uddhav Thackeray in Jalgaon : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ठाकरे गट) हे 23 एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी संध्याकाळी 5 वाजता पाचोरा येथे त्यांची विराट सभा होणार आहे.

Uddhav Thackeray in Jalgaon : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 23 एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. येत्या 23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे, आणि आता या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचे आयेजन केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या यापुर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याआधी झालेल्या सभांमधून राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

पक्षबांधणीसाठी सभा होत असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली, शिवसेनेतील काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले, यात पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांचाही समावेश होता. आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची चुलत बहीण म्हणजेच वैशाली सूर्यवंशी यांनी ठाकरे गटाला समर्थन दर्शवले, त्यानंतर पाचोरा तालुक्यात आमदार किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असे चित्र निर्माण झाले.

पाहा  Teaser

 

उद्धव ठाकरे त्यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्याच बरोबर, उद्धव ठाकरे संध्याकाळी साडेपाच वाजता पाचोऱ्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचेही अनावरण करणार आहेत.

असा असेल उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा - 

  • सकाळी 11 वाजता - जळगाव विमानतळावर आगमन
  • विमानतळावरुन खासगी वाहनाने पाचोरा तालुक्याकडे मार्गक्रमण
  • सकाळी 12:30 वाजता - पाचोरा निर्मल सिड्स विश्रामगृहात आगमन
  • दुपारी 1 ते 2 दरम्यान - भोजन
  • दुपारी 2 ते 3 दरम्यान - विश्रांती
  • दुपारी 3 ते 4 ची वेळ - राखीव
  • दुपारी 4:30 वाजता - तात्यासाहेब आर.ओ.पाटील प्रयोगशाळेचे उद्घाटन
  • संध्याकाळी 5.15 वाजता - शिवसेनेचे माजी आमदार (दिवंगत) आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचे उद्घाटन
  • संध्याकाळी 6.15 वाजता - एम.एम.महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा
  • रात्री 8 वाजता - जळगाव किंवा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

ही बातमी वाचा:

Uddhav Thackeray Speech Highlights : गोमूत्रधारी हिंदुत्व, लोकशाहीची दहीहंडी, संघाला सवाल; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget