Uddhav Thackeray : शाहू, फुलेंचा महाराष्ट्र मोदी-शाहांचा कधीही होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
Uddhav Thackeray : राज्यात महिला, राज्यकर्ते असुरक्षित आहेत. नेत्यांवर गोळीबार होतोय. या परिस्थितीत सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका केलीय.
Uddhav Thackeray मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कालच्या दसरा मेळाव्यात मी बोललोच आहे. मात्र बोलून बोलून बोलणार तरी किती? हा एक प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण हे जे सरकार आहे त्यात आपण बघितलं असेल की गद्दारांचा पंचनामा आहे. यात गद्दारी ही केवळ शिवसेना, राष्ट्रवादी पक्षासोबत नाही तर गद्दारी संपूर्ण महाराष्ट्र सोबत झाली आहे. जणू काही महाराष्ट्र ही मोदी-शाहांच्या गुलामांची वसाहत झाली आहे. अशा पद्धतीने हे सरकार चालतंय आणि चालवल्या जात आहे. राज्यात सध्या सर्वच बाबतीत बोजवारा उडाला आहे. काल सत्तेतील असलेले नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांची हत्या करण्यात आली.
महाराष्ट्रात मुंबई असे एकमेव शहर आहे की जिथे दोन पोलीस कमिशनर आहेत. त्यामुळे आणखी 5 पोलीस अधिकारी वाढवा, त्याला ही हरकत नाही. जे जे ज्यांचे लाडके असतील त्यांना कमिशनर करा. मात्र सुरक्षेचे काय? राज्यात महिला सुरक्षित नाही, राज्यकर्ते असुरक्षित आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर गोळीबार होतोय. या परिस्थितीत सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी कायम लढतच राहू, महाराष्ट्राला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही. किंबहुना, शाहू,फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी-शाहांचा कधीही होऊ देणार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यकर्ते म्हणून तुम्ही पदावर राहायच्या लायकीचे नाही- उद्धव ठाकरे
गद्दारांच्या सेवकाला एवढी सुरक्षा दिली आहे, ती सुरक्षा काढून तुम्ही जनतेला का देत नाहीत? त्यामुळे मला असं वाटतं की यांच्या घरी जुनी भांडी करणाऱ्यांना देखील सुरक्षा देत असावे. पोलीस जनतेचे रक्षक आहेत. सुरक्षा त्यांच्यासाठी वापरली जावी. या पद्धतीने जर का महाराष्ट्राच्या नेत्यांवर हल्ला होतं असेल, महिलांवर अत्याचार होत असेल. तर हे गंभीर आहे. आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची देखील हत्या करण्यात आली. साहजिकपणे ही सर्व जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. गृहमंत्री त्यांचे मोठ-मोठे होर्डिंग लावतात, मात्र या कारवायांची जबाबदारी स्वीकारत नाहीत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, उद्या गाडी खाली कुत्रा आला तरी ते राजीनामा मागतील. म्हणजे ते सर्वसामान्यांची तुलना कुत्र्यासोबत करत आहेत, म्हणजे तुम्ही राज्यकर्ते म्हणून पदावर राहायच्या लायकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.
शाहू, फुलेंचा महाराष्ट्र मोदी शाहांचा कधी होऊ देणार नाही
सिने-अभिनेते घेऊन मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. हा सर्व पैसा कुणापासून वसूल करण्यात येतो आहे. जो काही पैसा या जाहिरातींवर खर्च करत आहात तेवढाच पैसा जर का जनतेच्या सुरक्षिततेसाठी केला असता तर या घटना घडल्या नसत्या. या सर्व प्रकरणावर आम्ही वेळोवेळी बोलूच. राज्याज्या गद्दारांच्या पंचनामा निमित्य निष्क्रिय सरकारचे चित्र जनतेच्या न्यायालयात माडतो आहे. जनता या पूर्ण प्रकरणाचा योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करेल, असा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच आम्ही जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी कायम लढतच राहू, महाराष्ट्राला कुणाचाही गुलाम होऊ देणार नाही. शाहू,फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शाहांचा कधीही होऊ देणार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा