तुमच्यात शिस्त नाही, इकडे मला दादागिरी करायला आलात का? तुमचा रावसाहेब दानवेंना मदत करायचा धंदा सुरुय, जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले
Jayant Patil, जालना : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे.
Jayant Patil, जालना : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा पोहोचल्यानंतर जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. "तुमच्यात शिस्त नाही, मला इकडे दादागिरी करायला आलात का? तुमचा रावसाहेब दानवेंना मदत करायचा धंदा सुरुय", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जयंत पाटील काय काय म्हणाले ?
जालन्यात शिवस्वराज्य यात्रेमध्ये बोलत असताना जयंत पाटील म्हणाले, निवडणुका 3 लाख लोकांमध्ये होतात. आपण इथे दोन ते अडीच हजार माणसं बसलेलो आहोत. यातच तुमचे एकमेकांशी एवढे मैत्रीपूर्वी संबंध असतील तर अवघड आहे. तुम्हाला विजयापर्यंत पोहोचायचं असले तर बऱ्याच गोष्टी सहन करायच्या असतात. निवडणूक सोपी झालीये असं गृहीत धरु नका. आणखी निवडणुकीला 3 महिने वेळ आहे. बेरजेचे राजकारण करा, तरच आपल्याला निवडणुकीत यश मिळेल. कोणाला काय करायचे ते करु देत. तुम्ही स्वत: पक्षाचे मालक होऊ नका. वर बसलेले सांगत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही वागा. प्रत्येकजण एकमेकांची अवहेलना करायला लागला.
तिकिट मागण्याचा आणि हट्ट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तुम्ही इथे आलात, त्याच्याकडे बसा आणि शांत बसा. हिरोगिरी का करत आहात? कोणाला कमी लेखल्यामुळे आपण मोठे होत नाही. हे कायम लक्षात ठेवा. सर्वांना बरोबर घेऊन जायची ताकद असेल तर आपली निवडणूक सोपी होईल. मी शिवस्वराज्य यात्रेत अनेक ठिकाणी आलो. शेवटी कोणाला इच्छुक व्हायचं असेल तर त्याची इच्छा असेल. ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, पक्षात लोकशाही आहे. तिकिट मागण्याचा आणि हट्ट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. श्रेष्ठी मेरीट प्रमाणे आणि ज्याची लोकप्रियता आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतील. त्यामुळे तुम्ही विनाकारण पराचा कावळा करणे योग्य नाही. विधानसभेच्या निवडणुका 2 ते 3 महिन्यांनी सुरु होणार आहेत, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्व माहिती दिली आहे. सत्तेत जो काही सत्तेत आला त्यातून आपणा सर्वांना वाटू लागलं की, सत्तेत असताना आपण महाराष्ट्राच्या जनतेचे सेवा केली. पण काही लोकांनी 2 पक्ष फोडले. त्यामुळे लोकांचा हिरमोड झाला, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.
इतर महत्वाच्या बातम्या