एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचा 'बोईसर ते वांद्रे' मुंबई लोकलने प्रवास!

Uddhav Thackeray travels in Mumbai Local : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी बोईसर ते वांद्रे असा मुंबई लोकलने प्रवास केला आहे.

Uddhav Thackeray travels in Mumbai Local : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी बोईसर ते वांद्रे असा मुंबई लोकलने प्रवास केला आहे. यावेळी मिलिंद नार्वेकरही सोबत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या. उद्धव ठाकरेंनी पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेनंतर परतत असताना त्यांनी लोकलने प्रवास केलाय. 

उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना असा केला होता. पीएम मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात मोदींच नाणं चालणार नाही, इथे फक्त ठाकरे आणि पवारांचं नाणं चालणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

हा भाड** जनता पक्ष आहे

हा भाड** जनता पक्ष आहे. सीबीआय इडी लाऊन गद्दार फोडले. पालघरमधूनच  त्यांना सुरतेला घेऊन गेले. भगव्या सोबत आता लाल झेंडेही आहेत. आम्ही एक चूक केली. मागे मोदी  पंतप्रधान करा म्हणून प्रचार केला. असली भाजपचे तुमच्या कडे किती आहे? सगळे नकली बसलेत. तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो,असंही उद्धव ठाकरे पालघरच्या सभेत म्हणाले. दिल्लीतून फोन आला की यांची दाढी चराचरा करते, मुलाची उमेदवारीही हे जाहीर करू शकत नाहीत अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. पालघर जिल्ह्याचा विकास उत्तम झाला पाहिजे, पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. पालघरमध्ये मला वाढवण बंदर नको पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचं होतं. सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला आणि इकडे वाढवण बंदर करायचं, तिकडे बारसूमध्ये रिफायनरी मीच रद्द केली होती आणि त्या जनतेचा विरोध असेल तर होणार नाही हे सुद्धा सांगतिलं होतं, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Anil Parab on Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना उमेदवारी द्याच , तुम्हाला 'खरी शिवसेना' समजेल, अनिल परबांनी शड्डू ठोकला

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget